Saturday, April 27, 2024
Homeनाशिकमनसेना प्रमुख राज ठाकरेंचा दौरा बदल

मनसेना प्रमुख राज ठाकरेंचा दौरा बदल

नाशिक | प्रतिनीधी

मनसेना प्रमुख राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यात बदल करण्यात आला असून ते १८ ऐवजी १९ मे रोजी नाशिकमध्ये दाखल होणार आहे. तर २१ मे पर्यंत ते नाशिकमध्ये पक्ष संघटनात्मक बैठका घेणार आहेत. महापालिकेच्या आगामी निवडणुकीची रणनीती या बैठकांमध्ये ठरविली जाणार आहे. त्याचप्रमाणे नाशिक शहराध्यक्ष पदाचा तिढा देखील त्यांच्या उपस्थितीत सोडविण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान शहराध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक सलीम शेख यांचे नाव अग्रभागी चालत आहे.

- Advertisement -

राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर आता महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. गेल्या सव्वा वर्षांपासून प्रलबिंत असलेल्या मुंबई, नाशिक, पुणे या महत्त्वाच्या महापालिकांसह राज्यातील १८ महापालिकांच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याचा अंदाज आहे. या निवडणुकांच्या तयारीसाठी राज ठाकरे नाशिकच्या मैदानात उतरत आहेत. १८ ते २० मे असा त्यांचा नियोजित दौरा होता.

परंतु, त्यात आता किरकोळ बदल झाला असून, ठाकरे १८ ऐवजी १९ तारखेपासून तीन दिवस नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या तीन दिवसीय दौऱ्यासंदर्भात मंगळवारी (दि. १६) पक्षाच्या राजगड कार्यालयात बैठक झाली.

नाशिक मधील पक्ष संघटक मजबूत करण्याबरोबरच आगामी नाशिक महापालिका निवडणूक तसेच लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद आदी निवडणुकांच्या दृष्टीने रणनीती ठरविण्यासाठी राज ठाकरे यांछा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. दरम्यान राज ठाकरे यांच्या दौऱ्यात पक्ष संघटनेत मोठ्या प्रमाणात बदल होणार असल्याचे संकेत मिळत असून शहराध्यक्ष देखील नवीन मिळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या