Tuesday, May 14, 2024
Homeनगररेमडीसिवरचा काळा बाजार करणार्‍यास ठोकणार

रेमडीसिवरचा काळा बाजार करणार्‍यास ठोकणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरासह जिल्ह्यात रेमडीसिवर इंजेक्शनचा मोठ्याप्रमाणात काळा बाजार सुरू आहे. जो कोणी रेमडीसिवरचा काळा बाजार करेल

- Advertisement -

त्याला जागेवर ठोकणार असल्याचा इशारा मनसेचे नितीन भुतारे यांनी दिला आहे.

रेमडीसिवर इंजेक्शनची टंचाई भासत चालली असुन करोना आजारांवर उपचार घेणार्‍या रूग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. सर्वत्र भटकंती करुण सुध्दा रेमडीसिवर इंजेक्शन मिळत नसून कुठे मिळालेच तर काळ्या बाजारातून विकत घ्यावे लागत आहे. काळा बाजार करणार्‍याची माहिती आम्हाला द्या आम्ही त्यांना जागच्या जागी ठोकून काढू असा इशारा भुतारे यांनी दिला आहे.

बाजारभाव पेक्षा दुप्पट, तिप्पट किंमतीने रेमडीसिवर घ्यावे लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल चालु असुन सरकारचे या काळा बाजार करणार्‍यांवर कुठेही नियंत्रण नाही आहे. एका बाजुला अन्न व औषध प्रशासन जिल्ह्यात व शहरात पुरेसा रेमडीसिवर इंजेक्शन चा साठा उपलब्ध आहे असे जाहीर करतात तर दुसरीकडे त्याच रेमडीसिवर इंजेक्शन साठी रुग्णांच्या नातेवाईकांना गावभर फिरावे लागत आहे.

फिरूनही ते मिळत नाही त्या मुळे कोणी तरी काळा बाजार करणार्‍याचा पत्ता सांगतात व तेथून ते खरेदी करावे लागते रुग्णांचा गरजेचा फायदा हे रेमडीसिवर इंजेक्शनचा काळा बाजार करणारे हे एजंट लोक करीत असुन अश्याची गय केली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या