Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकमनसेना आक्रमक; संदर्भ सेवा रुग्णालयातील कॅथलॅब यंत्रणा सुरु करा अन्यथा...

मनसेना आक्रमक; संदर्भ सेवा रुग्णालयातील कॅथलॅब यंत्रणा सुरु करा अन्यथा…

नाशिक | प्रतिनिधी Nashik

उत्तर महाराष्ट्रातील (north maharashtra) गरीब, गरजू रुग्णांना गंभीर स्वरूपाच्या आजारांवर सवलतीच्या किंबहुना मोफत उपचार (Free treatment) मिळण्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या संदर्भ सेवा रुग्णालयातील (sandarbha seva hosptial nashik) विविध विभागांच्या सततच्या नादुरुस्त यंत्रणांमुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागत आहे….

- Advertisement -

मागील अनेक महिन्यांपासून बंद असलेली व आठच दिवसांपूर्वी सुरु करण्यात आलेली कॅथलॅब यंत्रणा (Cath lab) वीजपुरवठा करणारे यूपीएस (UPS) यंत्र बंद पडल्याने पुन्हा बंद पडली असून येथे अॅन्जिओग्राफी (angiography), अॅन्जिओप्लास्टी (angioplasty) साठी येणाऱ्या गरीब रुग्णांना नाईलाजाने खाजगी रुग्णालयांतील महागडे उपचार घ्यावे लागत आहेत.

शासनाच्या संदर्भ सेवा रुग्णालयाच्या (Sandarbha Seva Hospital) स्थापने मागील उद्देशालाच हरताळ फासल्यासारखे होत आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (MNS) संदर्भ रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना संदर्भ सेवा रुग्णालयातील विविध विभागांच्या महागड्या यंत्रणांच्या देखेरेखीचा ठेका असलेल्या कंपनीवर जबाबदारी निश्चित करून कडक दंडात्मक कारवाई करावी व याबाबत कायम स्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी मनसेना नाशिकच्या वतीने करण्यात आली आहे.

दरम्यान, याबाबत वैद्यकीय अधीक्षक (Medical Superintendent) यांनी योग्य ती उपाययोजना त्वरित करण्याचे आश्वासन दिले आहे. निवेदनावर मनसेना (MNS) शहराध्यक्ष दिलीप दातीर, उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके, नाशिकरोड विभाग अध्यक्ष विक्रम कदम, शहर सरचिटणीस राकेश परदेशी, निखील सरपोतदार, शहर संघटक संजय देवरे, अमित गांगुर्डे, विजय ठाकरे व किरण क्षिरसागर आदींची उपस्थिती होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या