Thursday, April 25, 2024
Homeराजकीयमनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाणार

मुंबई l Mumbai

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा नवा जोश भरण्यासाठी मेगा प्लॅन बनवला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे १ मार्च ते ९ मार्च दरम्यान एका दिवशी अयोध्येला जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. तसेच ९ मार्च नंतर राज ठाकरे राज्यभरामध्ये दौरा करणार असल्याचे समजते. राज यांचा हा दौरा झाल्यास मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्हे आहेत.

आगामी महापालिका निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीनं मनसेची महत्त्वाची बैठक आज वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये झाली. मनसेच्या पुढील रणनीतीवर या बैठकीत चर्चा झाली. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी बैठकीची माहिती पत्रकार परिषदेत दिली. राज ठाकरे हे १ ते ९ मार्च या कालावधीत अयोध्येचा दौरा करतील, असं नांदगावकर यांनी सांगितलं. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वरिष्ठ मंडळी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जाणार आहेत. त्याचा अहवाल राज ठाकरे यांना देतील. २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रज यांची जयंती हा मराठा राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. मनसे हा दिवस सण, उत्सव म्हणून धुमधडाक्यात साजरा केला जाईल. त्या दिवशी मराठी स्वाक्षरी मोहिम सुरु करण्यात येईल. राज ठाकरे मुंबई आणि ठाणेमध्ये सही करण्यासाठी जातील. मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांचा, संस्थाचालक, मराठी प्रकाशक, संपादक, कवी, लेखक, खेळाडू यांचा सन्मान मनसे करणार आहे. मराठी वृत्तपत्रे आणि मराठी वृत्तवाहिन्या, नाट्य कलावंत आणि सिनेकलावंत यांचा सन्मान करण्यात येणार आहे, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

दरम्यान, मागच्या वर्षी सात मार्चला मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येला गेले होते. महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शिवसेना अयोध्येमध्ये शक्तीप्रदर्शन केलं होतं. लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेने अनेकदा भाजपची कोंडी करण्यासाठी अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा लावून धरला होता. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यावर राम मंदिराचा प्रश्न सुटला. मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये हिंदुत्वाच्या मुद्दय़ावरून शिवसेनेची कोंडी होतानाचे चित्र पहायाला मिळाल. निवडणुका झाल्यानंतर अयोध्येला जाण्याचे ठाकरे यांनी जाहीर केले होतं. सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेने हिंदूुत्वाची भूमिका मवाळ केल्याची चर्चा सुरू झाली होती. याच सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी अयोध्या दौरा केला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या