Thursday, April 25, 2024
Homeनाशिकविजबिलांच्या शाॅक विरुध्द 'मनसे'चा धडक मोर्चा

विजबिलांच्या शाॅक विरुध्द ‘मनसे’चा धडक मोर्चा

नाशिक । प्रतिनिधी

करोना संकटात राज्य सरकारने जनतेला भरमसाठ विज बिलांचा शाॅक दिला असून गोरगरिबांनी ही बिले भरायची कशी असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी (दि.२६) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. विज बिलात सूट द्या या मागणिचे निवेदन जिल्हाधिकारि सूरज मांढरे यांना देण्यात आले. मागणी मान्य न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल, असा इशारा देत सरकारविरुध्द जोरदार घोषणाबाजी करण्यात आली….

- Advertisement -

राज्यातील जनता वाढीव विजबिलांमुळे त्रस्त असून झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी राज्यभर आंदोलनाची हाक दिली होती. नाशिकमध्ये पक्षाचे कार्यालय राजगड येथून मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

करोना संकटात गोरगरिबांचे संसार मोडकळीस आले आहे. जनतेचे अश्रू पुसण्याऐवजी वीज वितरण महामंडळातर्फे छुपी विज दरवाढ करण्यात आली असून लॉकडाऊनच्या काळात मोठ्या रकमेची वीज देयके जनतेला देण्यात आली. या मोगलाई कारभारावर राज्यातील जनतेत प्रचंड जनक्षोभ निर्माण झाला आहे.

महामंडळ ६० दिवसांच्यावर थकीत वीजबिलांवर १२ टक्के व ९० दिवसांवरील थकीत वीजबिलांवर १५ टक्के व्याज लावत असून हे सरकारी महामंडळ आहे का खाजगी सावकार असा प्रश्न गरीब जनतेला पडला आहे. त्यातही आधी वाढीव वीजबिल द्यायचे आणि ज्यांना हे भरमसाठ वीजबिल भरणे जमत नाही त्यांना संपूर्ण बिल न भरता अंशतः बिल भरायची सूट द्यायची.

अन उरलेल्या बिलावर गुपचूप व्याज लावायचे असा अजब कारभार महामंडळाने चालवला आहे. वाढीव वीजबिल संदर्भात वीज ग्राहकांचे गाऱ्हाणे सरकार दरबारी मांडून मोठ्या रकमेची सरासरी वीज देयके, अन्यायकारक विज दरवाढ तसेच थकीत विजदेयकांवरीलवरील व्याज तात्काळ रद्द करून वीज वापरानुसार वीजबिले देऊन जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

या प्रसंगी डॉ. प्रदिपचंद्र पवार, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी, दिलीप दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार, नगरसेवक सलिम शेख, योगेश शेवरे, नंदिनी बोडके, वैशाली भोसले आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या