Friday, April 26, 2024
Homeनाशिकमनरेगा उपायुक्तांची रेशीम उद्योगाला भेट

मनरेगा उपायुक्तांची रेशीम उद्योगाला भेट

सिन्नर । वार्ताहर Sinnar

खंबाळे येथे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून (Mahatma Gandhi National Employment Guarantee Scheme ) रेशीम उद्योग ( Silk Worm Trade )सुरू करण्यात आला आहे. विभागीय मनरेगा उपायुक्त डॉ. अर्जुन चिखले Divisional MGNREGA Deputy Commissioner Dr. Arjun Chikhale ) यांनी रेशीम उद्योगाला नुकतीच भेट देऊन शेतकर्‍यांशी संवाद साधला.

- Advertisement -

रेशीम शेती गावातील जास्तीत जास्त अल्प भूधारक शेतकर्‍यांनी करावी, असे आवाहन चिखले यांनी केले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तुती लागवड आणि कीटक संगोपनगृह यासाठी अनुदान दिले जाते. रेशीम उद्योग हा कृषी व वनसंपत्तीवर आधारित रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला उद्योग आहे. या उद्योगासाठी तीन वर्षे टप्प्याटप्प्याने अनुदान दिले जाते, असे रेशीम अधिकारी राकेश जोशी यांनी यावेळी सांगितले. खंबाळे ग्रामपंचायतीमध्ये गाय, गोठा, रेशीम उद्योग ही कामे सुरू करण्यात आली आहेत.

रेशीम उद्योगात येणार्‍या अडचणी, बदलत्या वातावरणाचा होणारा परिणाम, पाण्याच्या कमतरतेमुळे वाया जाणारे पीक, पारंपरिक शेती पद्धतीपेक्षा रेशीम शेती फायद्याची आहे का, यासह शासकीय अनुदान वेळेत मिळते का, या विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी सरपंच मीननाथ डावरे, प्रकल्प अधिकारी शरद जगताप, ग्रामसेवक मनोज शेलार, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ गोफणे, भाऊसाहेब दराडे, गणेश भालेराव, संपत आव्हाड, रमेश आव्हाड, संजय भाबड आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या