Saturday, April 27, 2024
Homeनगरअण्णांच्या मागण्यातील काही विषय राज्य सरकारशी निगडीत

अण्णांच्या मागण्यातील काही विषय राज्य सरकारशी निगडीत

सुपा |वार्ताहर| Supa

अण्णा हजारे यांची भेट घेऊन मी केंद्र सरकारशी निगडित काही प्रंलबित विषय आहेत, त्यावर चर्चा केली आहे.

- Advertisement -

यातील काही विषय राज्य सरकारचाही संबधीत आहेत. राज्याचे विद्यमान विरोधीपक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यातून मार्ग निघावा, यासाठी प्रयत्नशील असल्याचे माजी मंत्री तथा आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

माजी मंत्री भाजपचे नेते आ. विखे पाटील यांनी शनिवारी सांयकाळी राळेगणसिद्धी येथे येऊन ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे याची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये प्रदीर्घ वेळ चर्चा झाली. या भेटीनंतर आ. विखे यांनी त्रुटकच माहिती दिली. अण्णा व आ. विखे याच्यांतील चर्चेचा सविस्तर तपसिल समजू शकला नसला तरी चर्चेचा मुद्दा केंद्रीय कृषी मुल्य आयोग व अण्णांचा आगामी काळात आंदोलन यावर चर्चा झाली असे संकेत विखे याच्या बोलण्यातून मिळाले.

राजधानी दिल्लीच्या सीमेवर अगोदरच शेतकर्‍यांचे अंदोलन सुरू आहे. त्यावर जगभर चर्चा सुरू असताना अण्णांनी ही आंदोलनाचे रणशिंग फुकल्याने केंद्र सरकार कात्रीत सापडले आहे. यातुन मार्ग काढण्यासाठी भाजपचे नेते दूत अण्णांच्या भेटीला पाठवत आहेत. त्याअनुषंगाने शनिवारी जिल्ह्याचे भूमिपूत्र आ. विखे पाटील राळेगणला आले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या