Friday, April 26, 2024
Homeनगरजनतेतून सरपंचाची निवड रद्द करणे लोकशाहीचा अपमान

जनतेतून सरपंचाची निवड रद्द करणे लोकशाहीचा अपमान

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावचा सरपंच जनतेतून निवडण्याचा निर्णय घेतला होता.

- Advertisement -

परंतु, या सरकारने तो निर्णय रद्द करुन सदस्यांतून सरपंच निवडण्याचा निर्णय घेतल्यामुळे लोकशाहीचा अपमान करण्याचे काम केले. राष्ट्रवादीवाल्यांना वाळू तस्कर, मटक्यावाले तसेच लोकांची मुंडके मोडणार्‍यांना सरपंच करावयाचे आहे. या सरकारने शेतकर्‍यांना दिलेले पॅकेज फसवे आहे. करोना व अतिवृष्टीच्या संकटात सापडणार्‍या शेतकर्‍यांना तुटपुंजी अर्थसहाय्याची घोषणा करून विश्वासघात केला असल्याचा आरोप आष्टीचे भाजप आ. सुरेश धस यांनी यावेळी व्यक्त केली.

पारेगवाडी (ता. नगर) येथे विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी आ. धस बोलत होते. यावेळी आ. बबनराव पाचपुते, माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आ. पाचपुते म्हणाले, केंद्रामध्ये मोदी सरकारचे निर्णय जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम केले आहे. केंद्राची मदत कधीही शेतकर्‍यांपर्यंत आली नव्हती. जिल्हा बँकेत जनतेच्या प्रश्नांसाठी नेहमी संघर्ष केला. माजी आ. कर्डिले यांनी बँकेत जाऊन ती शेतकर्‍यांपर्यंत घेऊन जाण्याचे काम केले.

माजी आमदार कर्डिले म्हणाले की, केंद्र सरकारने गावच्या विकासाला चालना देण्यासाठी थेट ग्रामपंचायतीला निधी देण्याचे काम केल्यामुळे गावच्या विकासाला चालना मिळाली. युवकांनी राजकारणात येऊन चांगल्या कामाचा ठसा उमटवावा. राजकारण करत असताना नागरिकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. भाजप सरकारने दुधाला भाव देण्याचे काम केले. जनतेच्या सेवेशिवाय पद मिळत नाहीत, जनता हीच भांडवल समजून काम करावे, असे ते म्हणाले.

पद आणि लालसेपोटी तीन पक्ष एकत्र

महाराष्ट्रातील जनतेने भाजप, शिवसेना महायुतीला सत्ता स्थापनेसाठी कौल दिला. परंतु शिवसेनेने जनतेचा विश्वासघात करीत या तीन पक्षांनी सत्तेच्या लालसेपोटी व पदासाठी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. दुधाचे भाव कमी झाल्यामुळे शेतकरी हवालदिल होऊन कांदा उत्पादनाकडे वळला आहे. आ. बबनराव पाचपुते व माजी मंत्री कर्डिले हे जनतेच्या विश्वासावर सर्व निवडणुका वेगवेगळ्या चिन्हावर लढलेले आहेत, असे आ. धस यावेळी म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या