Tuesday, April 23, 2024
Homeनगरप्रत्येकाने जबाबदारीने काम करावे - आ. शिंदे

प्रत्येकाने जबाबदारीने काम करावे – आ. शिंदे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कितीही आमदार, खासदार, पदाधिकारी हे पक्षाशी गद्दारी करून सोडून गेले असले तरी सर्वसामान्य शिवसैनिक हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे. नगर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख म्हणून शिवसेनेने माझ्यावर जी जबाबदारी टाकली आहे ती, सर्वांना बरोबर घेऊन आपण पार पाडणार आहोत. प्रत्येकाने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडून पक्षाचे काम करावे, असे आवाहन नूतन जिल्हा संपर्क प्रमुख आ. सुनील शिंदे यांनी केले.

- Advertisement -

आ. शिंदे हे नगर दौर्‍यावर आले असता, शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांची बैठक घेत आढावा घेतला. याप्रसंगी जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. गाडे म्हणाले, जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहे. राजकीय घडामोडीचा नगर जिल्ह्यात कोणताही परिणाम झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या