Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यागोळीबार केल्याचा आरोपांवर सदा सरवणकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

गोळीबार केल्याचा आरोपांवर सदा सरवणकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

मुंबई | Mumbai

गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान प्रभादेवीत शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाली होती. या बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत झालं आहे. शनिवारी मध्यरात्री दादरमध्ये शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये तुफान राडा झाला.

- Advertisement -

यानंतर शिवसेनेकडून आमदार सदा सरवणकर यांच्यासह काही लोकांच्या विरोधात दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आमदार सदा सरवणकर यांच्यावर गोळीबाराचा आरोप शिवसेनेने केला आहे. पोलिसांनी या आरोपांची चौकशी सुरू केल्याची माहिती आहे. दरम्यान शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी माध्यमांसोमोर येत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

सदा सरवणकर म्हणाले, “मी या भागाचा आमदार आहे. मी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर काम करत आहे. त्यामुळे मला बदनाम करण्यासाठी रणनीती आखली जातेय. त्याचाच हा एक भाग आहे. मी कामाने मोठा झालेलो आमदार आहे. मी भांडणं करून मोठा झालेलो नाही. माझ्या मतदारसंघातील गल्लीबोळात काम दिसतील. त्यांच्याकडे (शिवसेना) दाखवण्यासाठी आणि सांगण्यासाठी काही नाही. त्यामुळे मला थांबवण्यासाठी हे आरोप केले जात आहेत”, अशी भूमिका सदा सरवणकर यांनी गोळीबाराच्या आरोपावर मांडली.

“परवाना असलेलं पिस्तुल माझ्याकडे आहे, पण माझ्याबरोबर स्टेनगन असलेली पोलीस फौज असताना मला त्याची काय गरज आहे”, असं सदा सरवणकर म्हणाले. पिस्तुल हातात असलेला एक व्हिडीओ सदा सरवणकर यांचा व्हायरल झाला आहे. त्यावर आमदार सरवणकर म्हणाले, “मला ते खरं वाटत नाही. सोशल मीडिया माझ्यासाठी अज्ञानाचा एक भाग आहे”, असं सदा सरवणकर यांनी म्हटलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या