Saturday, April 27, 2024
HomeनंदुरबारVideo आमदार जेव्हा एस.टी. बसमध्ये प्रवास करतात...!

Video आमदार जेव्हा एस.टी. बसमध्ये प्रवास करतात…!

मोदलपाडा, ता.तळोदा वार्ताहर MODALPADA

ग्रामीण भागातील थांब्यांवर एस.टी. बसेस (s t bus) थांबविण्यात येत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून (students) करण्यात आल्यामुळे आ.राजेश पाडवी यांनी आज स्वतःच अक्कलकुवा ते तळोदा दरम्यान बसमध्ये प्रवास करून विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी ग्रामीण भागात प्रत्येक थांब्यांवर शालेय विद्यार्थ्यांसाठी बसेस थांबविण्याचा सूचना अक्कलकुवा (Akkalkuva) आगार प्रमुखांना दिल्या.

- Advertisement -

Visual Story पारंपारिक साडी लूकमध्ये अशी दिसते पूजा सावंत

ग्रामीण भागातील बस थांब्यांवर राज्य परिवहन विभागाच्या बसेस थांबत नसल्याने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असतो.साहजिकच त्यांना शाळा, महाविद्यालयात जाता येत नाही.

परिणामी त्या दिवशी त्यांचे शैक्षणिक नुकसानदेखील होत असते. शिवाय शिक्षकांचा रोषही पत्करावा लागतो. बस थांब्यांवर एस.टी.बस न थांबण्याचा प्रकार विशेषतः अक्कलकुवा ते तळोदा या मार्गावर मोठ्या प्रमाणात घडत असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती.

शिवाय प्रत्येक बससाठी विद्यार्थ्याना तेथे ताटकळत बसावे लागत असे. सदर मार्गावर जवळपास २२ बसथांबे आहेत. थांब्यांवर बसेस थांबविण्यात याव्यात यासाठी पालकांनी सबंधित बस चालक, वाहक यांच्या मनमानी कारभाराबाबत प्रत्यक्षात आगार प्रमुखांकडे तक्रारीदेखील करण्यात आल्या होत्या.

त्या उपरांतही दखल घेतली जात नव्हती.हा प्रकार आजतागायत सुरु होता. शेवटी वैतागलेल्या पालकांनी बुधवारी आ.राजेश पाडवी यांचाकडे या मार्गावरील धावणार्‍या बसेसच्या मनमानीबाबत तक्रारी करून थांब्यांवर बसेस थांबविण्यात येत नसल्याने नाईलाजास्तव शाळेत गैरहजर रहावं लागत आहे.

परिणामी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याची व्यथा आ.राजेश पाडवी यांच्याकडे आठ दिवसांपूर्वी केली होती.पालकांच्या तक्रारीनुसार आ.पाडवी यांनी अक्कलकुवा आगार प्रमुखांशी संवाद साधून बसेस थांबविण्याबाबत सूचना केली होती.

तरीही बुधवारी थांब्यांवर बसेस न थांबण्याचा प्रकार झाल्याच्या पार्श्वभूमीवर आ. पाडवी यांनी थेट अक्कलकुवा आगारात जाऊन आगार प्रमुखांसमोर तीव्र नाराजी व्यक्त केली.

ग्रामीण भागात प्रत्येक बस थांब्यावर शालेय विद्यार्थ्यांसाठी बसेस थांबविण्याचा सूचना चालक, वाहकांना द्याव्यात. यापुढे अशा तक्रारी येणार नाहीत या बाबत दक्षता घेण्याचे सांगितले.त्यानंतर आ.पाडवी यांनी अक्कलकुवा ते तळोदा दरम्यान बसमध्ये प्रवास केला. प्रत्येक थांब्यांवर बसेस थांबल्या होत्या. त्यामुळे पालकांनी समाधान केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या