Friday, April 26, 2024
Homeनगरनुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासकीय मदत मिळवून देणार

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासकीय मदत मिळवून देणार

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

शनिवारी अचानक आलेल्या अवकाळी पाऊस गारपीट व वादळामुळे पाथर्डी तालुक्यातील शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले.

- Advertisement -

या नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करुन मदतीसाठी सरकारकडे मागणी केली आहे. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने जास्तीत जास्त नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा करून मदत मिळवुन देऊ असा विश्वास देत आमदार मोनिकाताई राजळे यांनी बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना धीर दिला.

तालुक्यात अचानक आलेल्या अवकाळी पाऊस, वादळ व गारपीटीमुळे तालुक्यातील 15 ते 20 गावातील शेकडो एकर क्षेत्रावरील पिकांचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले आहे. आ. राजळे यांनी प्रशासनासह बाधीत चितळी, पाडळी, साकेगाव काळेगाव, सुसरे, पागोरी पिंपळगाव, सोमठाणे, सांगवी, प्रभुपिपंरी, माळेगाव, निपाणी जळगाव, कोरडगाव, कळसपिंप्री,आखेगाव, ढवळेवाडी या गावला भेट देवुन पाहणी केली.

त्यावेळी आ. राजळे उपस्थित ग्रामस्थांसमोर बोलत होत्या. उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण, तहसिलदार शाम वाडकर, तालुका कृषी अधिकारी प्रविण भोर, जि.प.सदस्य राहुल राजळे, पं.स.सभापती गोकुळ दौंड, विष्णुपंत अकोलकर, जमीर आतार, राजेंद्र दराडे, बंडु नागरे,उद्धव घनवट, अबुभाई पटेल, आप्पासाहेब सातपुते, साहेबराव सातपुते, नितीन सातपुते उपस्थीत होते. अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास गारपीटीमुळे हिरावला गेला आहे.

पिकासाठी झालेल्या लाखो रुपयाचा खर्च वाया गेल्याने शेतकरी कर्जबाजारी होणार आहे. सुसरे व परीसरातील गावातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.सरकारने शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी. पाथर्डी व शेवगाव तालुक्यात महसुल व कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी पाहणी करुन नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरवात केली असून तातडीने पंचनामे करुन सरकारकडे मदतीसाठीचा प्रस्ताव पाठविला जाईल.

सरकारने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, यासाठी पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना याबाबत तातडीने निवेदन देण्यात आले आहे.

काळेगाव येथील चंदा मोहन सातपुते या महीलेचे घर वादळात पडल्याने तिचा संसार उघड्यावर आला. घडलेली परस्थिती सांगताना सातपुते यांना आश्रु अनावर झाल्याने आ. राजळेही यावेळी भावुक झाल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या