Friday, April 26, 2024
Homeनगर‘माझा जीव माझीच जबाबदारी’ म्हणण्याची वेळ

‘माझा जीव माझीच जबाबदारी’ म्हणण्याची वेळ

तळेगाव दिघे |वार्ताहर| talegav Dighe

महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजी कारभारामुळेच जनतेवर आता ‘माझा जीव माझीच जबाबदारी’ असे म्हणण्याची वेळ आली असल्याची टक्षका भाजपा नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. जनतेला सल्ले देण्यापेक्षा ‘प्रवरे’ प्रमाणे व्यवस्था उभी केली असती तरी कोव्हिड संकटात जनतेला दिलासा मिळाला असता, असा टोलाही त्यांनी लगावला.

- Advertisement -

संगमनेर तालुक्यातील निमोण येथील पुष्पगंध सेवाभावी संस्था आणि ग्रामपंचायतीच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या कोव्हिड सेंटरचे उद्घाटन आमदार विखे पाटील यांच्याहस्ते पार पडले. कोव्हिड नियमावलीचे पालन करून हा औपचारिक कार्यक्रम संपन्न झाला. पुष्पगंध सेवाभावी संस्थेचे संदीप देशमुख, सरपंच दगडू घुगे, सोनेवाडीचे सरपंच शरद पवार, भाजपच्या किसान आघाडीचे अध्यक्ष सतीश कानवडे, गंगाधर कांडेकर, त्र्यंबक गोमासे यावेळी उपस्थित होते.

सरकारची व्यवस्था जेव्हा अपयशी ठरते तेव्हा समाजातील तरुण धैर्याने पुढे येऊन सामान्य माणसाला आधार देण्याचे काम करतात, हीच खरी ईश्वर सेवा असल्याचे नमूद करून आ. विखे पाटील म्हणाले की, या संकटाची तिसरी लाट येण्याची चर्चा आता सुरू झाली आहे. आताच रुग्णांना बेड मिळत नाही, इंजेक्शन जादा दराने खरेदी करण्याची वेळ आली. काही खासगी रुग्णालयात कंपाउंडरच आता सल्ले देऊन रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना घाबरून देत आहे. सरकारची कोणतीच व्यवस्था नसल्याने सामान्य माणसाला खासगी रुग्णालयांचा आश्रय घ्यावा लागल्याने अर्थिक संकट मोठे उभे राहिल्याचे आ. विखे पाटील म्हणाले.

निमोण येथे सुरू करण्यात आलेल्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये 100 बेडची व्यवस्था करण्यात आल्याचे संदीप देशमुख यांनी सांगितले. प्रसंगी त्र्यंबक गोमासे, कैलास पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. साहेबराव घुगे, गोरख घुगे, रोहिणी तपासे, शिवराम इलग, एकनाथ शेळके उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या