Friday, April 26, 2024
Homeनगरआ. विखे पाटील यांनी आझाद मैदानात घेतली संभाजीराजेंची भेट

आ. विखे पाटील यांनी आझाद मैदानात घेतली संभाजीराजेंची भेट

लोणी |प्रतिनिधी| Loni

मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यत समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फीचा भार सरकारने उचलावा, अशी मागणी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आझाद मैदानात बोलताना केली. आ. विखे पाटील यांनी छत्रपती खा. संभाजीराजे यांची उपोषण स्थळी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. खा. संभाजीराजे आणि आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला.

- Advertisement -

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या कोणत्याही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. त्यामुळेच खा. छत्रपती संभाजीराजेंना उपोषण करण्याची वेळ आली. या सरकारकडून फक्त बैठकांचा फार्स सुरू आहे. बंद दाराआड चर्चा करण्यापेक्षा सरकारने ऑनलाईन चर्चा आता घेतल्या पाहिजेत, अशी मागणी करून यावरूनच आरक्षणच्या बाबतीतली यांची भूमिका किती प्रामाणिक आहे हे समजेल, असे मत व्यक्त केले.

आरक्षणच्या संदर्भात न्यायालयीन प्रक्रीया सुरू आहे. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत समाजातील विद्यार्थ्याची सर्व शैक्षणिक फी सरकारने भरावी, अशी मागणी आ. विखे पाटील यांनी केली. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने शिर्डी मतदार संघातील मराठा आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना 50 टक्के शैक्षणिक फी माफ केली. असा निर्णय करणारी राज्यातील एकमेव संस्था असल्याचे विखे पाटील म्हणाले. आझाद मैदानावर राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांशी आ.विखे पाटील यांनी चर्चा केली.

खा. संभाजीराजेकडून अभिनंदन

आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यामातून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलेल्या फी सवलतीचा खा. संभाजीराजे यांनी आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख करून आ. विखे यांचे अभिनंदन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या