Saturday, April 27, 2024
Homeनगरकोकणामधील आपत्तीग्रस्तांसाठी आ.विखेंचे एक महिन्याचे वेतन

कोकणामधील आपत्तीग्रस्तांसाठी आ.विखेंचे एक महिन्याचे वेतन

शिर्डी | प्रतिनिधी

कोकण मधील आपत्तीग्रस्तांसाठी (disaster victims in Konkan) राज्यसरकारचा (State govt) हात आखडताच आहे. कोकणावर (Kokan) आलेलं संकट हे आपल्‍याच कुटूंबावर आलेल आहे….

- Advertisement -

नुसता शाब्दीक दिलासा देवून काही होणार नाही. कोकणवासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाण्याची वेळ असून, शिर्डी मतदार संघातून (Shirdi constituency) कार्यकर्त्‍यांनी गापातळीवर मदतीसाठी पुढाकार घ्‍यावा असे आवाहन करतानाच, त्यांच्या मदतीकरीता एक महीन्याचे वेतन (One month’s salary) देण्‍याचा निर्णय आ.राधाकृष्ण विखे पाटील (MLA Radhakrishn Vikhe Patil) यांनी जाहीर केला.

यासंदर्भात बोलताना आ.विखे पाटील म्हणाले की, ‘कोकणमध्ये आलेले नैसर्गिक संकट (Natural disasters) खूप भीषण असून राज्य सरकारने (thackeray govt) तात्काळ मदत जाहीर करणे अपेक्षित होते, पण तसे होताना दिसत नाही. कोकणातील नागरीकांच्या मदतीसाठी शिर्डी विधानसभा मतदारसंघातून (Shirdi Assembly constituency) मदत पाठविण्याचे नियोजन गावपातळीवर करण्याच्या सूचना आ.विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. ही एकत्रित मदत कोकणात संकटग्रस्‍त कुटुंबियांपर्यंत पोहचविण्‍यात येईल. माणूसकीचा धर्म म्‍हणून मतदार संघातील सर्व कार्यकर्त्‍यांनी आपल्‍या गावातून शक्‍य ती मदत गोळा करुन, कोकणातील आपत्तीग्रस्‍तांना पाठविण्‍यासाठी पुढाकार घेण्‍याचे आवाहनही आ.विखे पाटील यांनी कार्यकर्त्‍यांना केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या