Thursday, April 25, 2024
Homeनगरअकोळनेर जिल्हा परिषद शाळा डिजिटल करणार - आ. लंके

अकोळनेर जिल्हा परिषद शाळा डिजिटल करणार – आ. लंके

अहमदनगर (प्रतिनिधी) – पारनेर-नगर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी नगर तालुक्यातील अकोळनेर हे गाव दत्तक घेतले असून, या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिजिटल करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झालेल्या बैठकी दरम्यान घेण्यात आला. बैठकीसाठी आमदार निलेश लंके यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर व अकोळनेर ग्रामस्थांसह शिक्षण तज्ञ उपस्थित होते.

आमदार लंके म्हणाले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षण हे पायाभूत शिक्षण असल्याने ते चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना भेटल्यास विद्यार्थी सर्वगुणसंपन्न तयार होतील व देशाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावतील. अकोळनेरची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संपूर्ण डिजिटल करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना हसत-खेळत व आधुनिक पद्धतीने शिक्षण देण्यासाठी ही शाळा देशातील एक आदर्श मॉडेल असेल.

- Advertisement -

या कामासाठी निधीची व्यवस्था शासकीय निधी बरोबरच सीएसआर फंड व लोकसहभागातून करण्यात येणार आहे. शाळा डिजिटल करण्याबरोबरच शाळेतील विविध प्रकारच्या सुविधा जसे की पाणी, स्वच्छता, सुसज्ज क्रीडांगण या सर्व सेवा-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. भविष्यात मतदार संघातील सर्व शाळा डिजिटल करण्याचाही विचार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या