Friday, April 26, 2024
Homeनगरआमदार लंके अजित पवारांच्या तंबुत डेरे दाखल

आमदार लंके अजित पवारांच्या तंबुत डेरे दाखल

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पारनेरचे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार निलेश लंके बुधवारी मुंबईमधील अजित पवाराच्या मेळाव्याला कार्यकर्त्यांसह उपस्थित राहिल्याने लंके हे अजितदादांबरोबर गेल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी मोठा राजकीय भूकंप होऊन राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. तेव्हा कोण शरद पवारांबरोबर तर कोण अजित पवारांबरोबर याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रतील चाळीस आमदार आपल्याबरोबर आसल्याचा दावा अजित पवार यांनी केला होता. तर इकडे शरद पवार यांनीही बहुतांशी आमदार खासदार आपल्याबरोबर असल्याचे माध्यमांना सांगितले होते. रविवारी राजभवनात झालेल्या शपथ विधीला मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित होते. तर त्यानंतर काहींनी यु टर्न घेत शरद पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला होता.

रविवारी अजित पवारांच्या शपथविधिला पारनेरचे आमदार निलेश लंके राजभवनात उपस्थित होते. यावरून ते अजित पवारांच्या गोटात गेले हे राज्यासह मतदार संघात सर्वदूर कळले होते. परंतु त्यानंतर दुसर्‍या दिवशी आमदार लंके यांनी प्रसार माध्यमाना सांगितले की एक दोन दिवसात संपूर्ण पवार कुटुंब एक होईल व पक्ष एकसंघ राहून सर्वाना अपेक्षित अशी चांगली बातमी कळेल. तसेच आमदार लंके यांनी मंगळवारी पारनेर येथे बुथ कमिटी आढावा मेळाव्यात देखील संपूर्ण पवार कुटुंब व राष्ट्रवादी पक्ष एक होईल अशी आशा व्यक्त करत आपण कोणा सोबत हे स्पष्ट केले नव्हते. त्यामुळे बुधवारी मुबईत होणार्‍या मेळाव्यात आमदार लंके शरद पवारांच्या मेळाव्याला उपस्थित राहतात की आजित दादांच्या मेळाव्याला हजेरी लावतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अखेर बुधवारी सकाळी आमदार निलेश लंके अजित पवारांच्या मेळाव्याला कार्यकर्त्यांसह उपस्थित रहिल्याने लंके अजित दादांच्या गोटातच आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर शरद पवार व अजित पवार या दोन्ही नेत्यानी बुधवारी मुबई मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे घेत शक्ती प्रदर्शन केले होते. यात कोण कोणाबरोबर याची उत्सुकता लागून होती . अखेर मेळावे चालू झाल्यावर कोण कुठे, कोण कोणा बरोबर हे दूरचित्र वाहिन्यांवर दिसू लागले होते. त्यात पारनेरचे आमदार निलेश लंके अजित दादांच्या मेळाव्याला उपस्थित होते.

मंगळवारी पारनेरमधील कार्यक्रमात निलेश लंके म्हणाले होते की माझ्यासाठी शरद पवार, सुप्रियाताई व अजित दादा हे तीनही महत्त्वाचे आहेत हे तिन्ही पुन्हा एकत्र येतील अशा अशावाद व्यक्त केल्याने व आपली भूमिका स्पष्ट न केल्याने निलेश लंके कोणाबरोबर जाणार याची उत्सुकता तालुक्यात लागून राहिली होती .

- Advertisment -

ताज्या बातम्या