Friday, April 26, 2024
Homeजळगावआ.महाजन यांनी खोटे गुन्हे दाखल करुन जमीन, संस्था हडपल्या - अ‍ॅड. विजय...

आ.महाजन यांनी खोटे गुन्हे दाखल करुन जमीन, संस्था हडपल्या – अ‍ॅड. विजय पाटील

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या रासलीलांची माझ्याकडे सीडीज व पेन ड्राईव्ह आहेत. आम्ही जे गुन्हे व तक्रारी दाखल करतो ते पुराव्यानिशी दाखल करतो.

- Advertisement -

खोटे गुन्हे दाखल करुन महाजनांनी जामनेर तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात इतर ठिकाणी अनेक शैक्षणिक संस्था हडपल्या आहेत. याबाबतही पुरावे तसेच माझ्याकडे प्राप्त झाल्या

आहेत. याप्रकारे अ‍ॅड. विजय पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेद्वारे माजी मंत्री गिरीश महाजन यांना प्रत्युत्तर दिले.

तसेच महाजन यांनी पोलिसांना वापरुन माझ्या कुटुंबांचा छळ केला असून अशाप्रकारे दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्याच्या त्रासामुळे नरेंद्रआण्णा भास्कर पाटील यांचा मृत्यू झाला असून त्याच्या मृत्यूस जबाबदार म्हणून महाजनांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची विनंती न्यायालयाला करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मंत्री महाजन सांगत होते तसे पोलीस नाचत होते

माजी मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्यासह 29 जणांवर निंभोरा येथे दाखल होवून पुणे येथे वर्ग झालेला गुन्हा हा खोटा असून यामागे कुणीतरी सूत्रधार किंवा मोठा नेता असल्याचे सांगितले होते.

त्यावर अ‍ॅड. विजय पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून या सर्व प्रश्नाबाबत खुलासा केला. तसेच मूळ फिर्याद ही सात ते आठ पानांची असून त्यात 2018 ते 2019 दरम्यान कशाप्रकारे त्रास दिला. या सर्व गोष्टी सविस्तर पणे नमूद केल्या आहेत.अनेक गोष्टी आहेत.

तसेच आमचा कोणत्याही राजकीय पक्ष अथवा नेत्याशी संबंध नाही. स्वतंत्र अस्तित्व असून जे गुन्हे दाखल करतो ते पुराव्यानिशी करतो. गुन्हा कुठलेही दाखल करता येतो ही कायद्यात तरतूद आहे.

तसेच तीन वर्षानंतर गुन्हा दाखल झाला त्याचे कारण म्हणजे गिरीश महाजन हे मंत्री होते. मंत्री महाजन सांगत होते, तसे पोलीस नाचत होते. त्यामुळे तेव्हा तक्रार करुन उपयोग झाला नसता. कारण सत्तेचा उपयोग करुन त्यांनी हा गुन्हा रद्द केला असता. असे होवू नये म्हणून तक्रार देण्यास विलंब झाला असल्याचे स्पष्टीकरणही अ‍ॅड. विजय पाटील यांनी दिले.

विधान परिषद निवडणुकीत माघार ने घेतल्याने त्रास

2017 मध्ये अ‍ॅड. विजय पाटील यांनी विधानपरिषदेची निवडणुक लढविली होती. यावेळी महाजनांनी माघार घेण्यास सांगितले होते. मात्र मी नकार दिला होता.

मंत्री असतांनाही नकार दिला म्हणून तेव्हा पासून माझ्यासह माझ्या कुटुंबावर महाजन यांनी सत्तेचा वापर करुन पोलिसांना हाताशी धरुन खोटे गुन्हे दाखल करुन छळ करण्यास सुरुवात केली. यात जिल्हापेठ पोलिसात 307 तसेच अपहाराचा गुन्हा दाखल केला. मारवड पोलिसात अपहाराचा गुन्हा दाखल केला.

यात विशेष म्हणजे महिलांवरही गुन्हे दाखल केले. पोलीस अधीक्षक, पोलीस निरिक्षक यांना मेनेज करुन महाजनांनी घडवून आणले.

विशेष म्हणजे 307 हे कलम महाजनांचे आवडते कलम असून त्यांना नडणार्‍या किंवा जागा किंवा संस्था बळकावण्यासाठी संबंधितांवर 307 नुसार खोटे गुन्हे दाखल करतात.

याप्रमाणे त्यांनी जामनेर, पहूर येथील शैक्षणिक संस्था हडप केल्या असल्याचेही अ‍ॅड. विजय पाटील म्हणाले. यानंंतर सतत तीन वर्ष छळ केला असेही ते म्हणाले.

मविप्रच्या सहाशे कोटींची जागा महाजनांना हवी होती

माजी मंत्री गिरीश महाजन यांना जमीनी ताब्यात घेण्याचे व्यसन आहे. यात बिल्डर म्हणून खटोड, सुनील झंवर हे जाणकार असल्याने ते जागेची किंमत लक्षात घेतात. त्यानुसार मविप्रची जागेची किंमत बाजारभावानुसार सहाशे कोटी रुपयांची असल्याने ती जागा ताब्यात घेण्यासाठी महाजन यांनी त्रास दिला.

महाजन म्हणतात की माझा मविप्रशी संबंध नाही. मात्र त्यांना इतर शैक्षणिक संस्थांप्रमाणे खोटे गुन्हे, तक्रारी दाख करुन, मंत्री तसेच संस्था असल्याने नियमबाह्य शासन आदेश काढून मविप्र सुध्दा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, असेही ते अ‍ॅड. विजय पाटील यावेळी म्हणाले.

सीडीआर तपासा

गिरीश महाजन यांचे तसेच माझेही मोबाईलचा सीडीआर काढावे. महाजनांचा सीडीआर काढला तर डॉली, रीटा, स्वीटी याप्रमाणे अनेक रासलीला समोर येतील, असा दावाही अ‍ॅड. पाटील यांनी केला. 307 प्रमाणे खोटे गुन्हे दाखल करुन महाजनांचे राजकारण सुरु आहे.

निंभोरा येथील दाखल गुन्ह्याबाबत बोलतांना अ‍ॅड. विजय पाटील यांनी गिरीश महाजनांच्या सांगण्यावरुन सर्व प्रकरण घडले. मला खंडणीही मागितण्यात आली.

यात मी जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संजय गायकवाड यांनी दोन लाख तर निलेश भोईटे यांना मी माझ्या हाताने 3 लाख रुपयांची खंडणी दिल्याचेही अ‍ॅड. विजय पाटील म्हणाले. माझी तक्रार खोटी असेल तर सिध्द करावे व अब्रुनुकसानी दावा टाकावा असे आव्हानही पाटील यांनी महाजनांना दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या