आ. लहू कानडे यांनी केली कोवीड सेंटरची पाहणी

jalgaon-digital
2 Min Read

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

आमदार लहू कानडे यांनी सर्व अधिकार्‍यांसमवेत नव्याने उभारलेल्या 500 रुग्णांसाठीच्या कोवीड सेंटरला भेट देऊन

तेथील सोयीसुविधांची पाहणी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमीत्ताने दिलेल्या भेटीदरम्यान कोवीड सेंटरसमोर बाबासाहेबांच्या प्रतिमेची पुजा करुन तेथील कर्मचारी यांच्यासमवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.

यावेळी त्यांनी 100 रुग्णांचे कोवीड सेंटर बघून तेथील पिण्याच्या पाण्याच्या मोकळ्या बाटल्या व कचरा कर्मचार्‍यांना तातडीने स्वच्छ करण्याच्या सुचना दिल्या. तसेच कोवीड सेंटरकडे येणारा रस्ता आजच दुरुस्त करण्यासंबंधी बांधकाम विभागास सुचना दिल्या. कोवीड सेंटरमध्ये मिळणार्‍या जेवणाबद्दल त्यांनी चौकशी केली.

विलगीकरणामध्ये असणारे काही रुग्ण तंबाखू किंवा गुटखा खाऊन इमारतीत थुंकून घाण करत असल्यााचे आढळून आल्यानंतर त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. अशी घाण करणार्‍या किंवा गुटखा खाणार्‍या कुणालाही तेथे प्रवेश देऊ नका, अशा त्यांनी सुचना दिल्या. शिरसगाव ग्रामपंचायतीने या वसतीगृहामध्ये त्यांच्या पाणीपुरवठा योजनेची कनेक्शन्स दिलेली आहेत. त्याचे काम तातडीने पुर्ण करुन घेण्यात आल्यामुळे आता तेथे टँकरची पाण्याची आवश्यकता राहिली नाही.

कोवीड सेंटरमध्ये सर्व कामे शासकीय अधिकारी व कर्मचारीच करीत आहेत. त्यांच्याशी संवाद साधताना आमदार कानडे यांनी कोरोना महामारी हे नैसर्गिक संकट असून आपण सर्वांनी समन्वयाने व समर्पित भावनेने काम केले पाहिजे. आपण उत्तम काम करीत आहात, कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ देणार नाही, काही प्रशन निर्माण झाल्यास माझ्याशी सिंंपर्क ठेवा, तथापि कोरोनाने त्रस्त झालेल्या मतदारांसाठी आपण सर्वजण मिळून कष्ट करुयात, असे आवाहन केले.

ग्रामीण रुग्णालयापाठोपाठ एक मोठे रुग्णालय अधिगृहीत करुन पुन्हा 50-60 ऑक्सीजन बेड उपलब्ध करुन देण्याचा प्रशासन प्रयत्न करणार असून त्यासाठी आपण सातत्याने जिल्हाधिकार्‍यांच्या संपर्कात आहोत. दोन दिवसातच त्याबाबत निर्णय होईल व त्यामुळे ऑस्कीजन बेडसह उत्तम आणि मोफत उपचाराची अधिक सोय होईल, असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी अनिल पवार, प्रभारी तहसिलदार श्री. गोर्वधने, पोलीस निरीक्षक संजय सानप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे व इतर आरोग्य अधिकारी तसेच ज्ञानेश्वर मुरकुटे, सतिष बोर्डे, राजेंद्र औताडे आदी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *