Thursday, April 25, 2024
Homeनगरश्रीरामपूर तालुक्यात गावनिहाय पुन्हा पंचनामे करून घ्यावेत- आ. कानडे

श्रीरामपूर तालुक्यात गावनिहाय पुन्हा पंचनामे करून घ्यावेत- आ. कानडे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अवकाळी पावसामुळे श्रीरामपूर तालुक्यात प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र अधिकारी वर्ग या नुकसानीचे पंचनामे करीत

- Advertisement -

नसल्याच्या तक्रारी शेतकर्‍यांनी केल्या आहेत. तरी गावनिहाय पंचनाम्याचा आढावा घेऊन पुन्हा पंचनामे करून घ्यावेत, अशी मागणी आ. लहू कानडे यांनी केली आहे.

आ. लहू कानडे यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन पाठविले असून निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, माझ्याकडे श्रीरामपूर मतदार संघातील बहुतांश शेतकर्‍यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक पंचनामे करत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. शेतात संपूर्ण पिके उद्ध्वस्त झालेली असताना तिथे पिके नाहीत असे सांगून पंचनामे करण्याचे टाळले जात आहे. श्रीरामपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक आहेत.

या अतिवृष्टीमुळे महागडे कांदा बियाणे मातीत घालून कांदा रोपे या दिवसात तयार केली जातात. सदरची पिके सुक्ष्म असतात अतिवृष्टीमुळे त्यांना नामुक्षही राहिलेला नाहीत.अशा ठिकाणचे पंचनामे टाळण्यात आले आहेत. तसेच शेतकर्‍याने कापणी केली असे म्हणून जी पिके आज शेतात उपलब्ध नाहीत.

तेथेही पंचनामे टाळली जात आहेत. वास्तविक या अधिकारी व कर्मचार्‍यांनी शेतकर्‍यांकडे चौकशी करून खरोखर त्यांच्या पदरात काही उत्पन्न पडले आहे की नाही याची खातरजमा करणे आवश्यक आहे.तथापि रब्बीच्या पिकांसाठी शेतीची पुढील मशागत करण्यासाठी कापलेल्या पिकांबाबत पंचनामे टाळले जात आहेत. तरी पुन्हा गावनिहाय सर्व पंचनाम्यांचा आढावा घ्यावा, आवश्यकतेप्रमाणे पुन्हा पंचनामे करून घ्यावे,असे आ. कानडे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या