Friday, April 26, 2024
Homeनगरआ. कानडे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करा

आ. कानडे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करा

श्रीरामपूूर |प्रतिनिधी| Shrirampur

दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या गाईच्या दुधाला दरवाढ मिळावी म्हणून आंदोलन करणार्‍या भाजपा पदाधिकार्‍यांवर व दूध उत्पादक शेतकर्‍यांवर गुन्हा दाखल करा,

- Advertisement -

अशी मागणी करणार्‍या आमदारांनीच कायदा-सुव्यवस्थेचा भंग केला श्रीरामपूरच्या बेजबाबदार लोकंप्रतिनिधींच्या हस्ते कोव्हिड सेंटरमध्ये समाज कल्याण विभागाच्या वतीने गटई कामगारांच्या टपर्‍यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले गेले नाही. शासकीय अधिकारी पदाधिकार्‍यांना जर नियमांचे उल्लंघन करून कार्यक्रम घेण्यास भाग पाडत असतील तर या बेजबाबदार आमदारांविरुध्द गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी मागणी श्रीरामपूर भाजपाच्यावतीने करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी लोकप्रतिनिधींच्या समवेत त्यांचे सहकारी बरोबरच समाज कल्याण विभागाचे अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्यासह 53 लाभार्थी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोव्हिड 19 च्या काळात राज्यात कलम 144 लागु असताना कायद्याचे उल्लंघन करून बेजबाबदारपणे गर्दी करणार्‍या लोकप्रतिनिधींवर गुन्हा दाखल करावा.

कोव्हिड सेंटर हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेला असताना देखील सेंटरच्या लगत हा कार्यक्रम घेण्यात आला. विशेष म्हणजे कार्यक्रमासाठी वाटप करण्यात येणार्‍या टपर्‍यांचे सुट्टे भाग हे कोव्हिड सेंटरमधील आवारामध्ये ठेवण्यात आले होते.

तेथुनच त्यातील एक टपरी कार्यक्रम स्थळी आणण्यात आली. त्यामुळे शासकीय अधिकारी पदाधिकार्‍यांना जर नियमांचे उल्लंघन करून कार्यक्रम घेण्यास भाग पाडत असतील तर या बेजबाबदार व निष्क्रिय आमदारांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी मागणी श्रीरामपूर भाजपा तालुका अध्यक्ष सुनील वाणी, अशोकचे संचालक बबन मुठे, भाजपा शहर संघटन सरचिटणीस सतीश सौदागर, विशाल अंभोरे, विशाल यादव यांनी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्याकडे निवेदनाद्वारें केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या