Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याएकदा नव्हे शंभरदा जरी निलंबित केले तरी ओबीसी समाजासाठी संघर्ष करणारच..

एकदा नव्हे शंभरदा जरी निलंबित केले तरी ओबीसी समाजासाठी संघर्ष करणारच..

दोंडाईचा – Dondaicha – प्रतिनिधी :

एकदा नव्हे शंभरदा जरी निलंबित केले तरी ओबीसी समाजासाठी संघर्ष करणार, अशी प्रतिक्रीया आ. जयकुमार रावल यांनी दिली आहे.

- Advertisement -

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे सुप्रीम कोर्टाने ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला, यासाठी राज्य सरकारच्या तारिख पे तारीख या गलथानपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण कायमचे रद्द करण्यात आले. यावर विधानसभेत चर्चा घडवून आणावी, अशी मागणी आम्ही केली. एवढा मोठा ज्वलंत विषय असल्याने आम्ही ही मागणी लावून धरली. आमदारांना आपले मत मांडण्याचा अधिकार विधानसभेत आहेत. परंतु हे सरकार हुकुमशहा प्रमाणे सरकार चालवीत आहे. सदस्यांचे अधिकारावर गदा आणण्याचे काम या सरकारकडून होत आहे. ओबीसी व भटक्या जाती विमुक्त जमाती यासमाजाचे आरक्षण रद्द करण्याचा घाट या सरकारने घालून दिला आहे आणि त्यावर कुणी बोलू नये असे कसे चालणार.? ओबीसी व भटक्या समाजाच्या न्याय व हक्कांसाठी मला या सरकारने एकदा नव्हे तर शंभरदा जरी निलंबित केले तरी आमचा आवाज दाबला जाणार नाही, आम्हांला विधानसभेत निलंबित केले आहे आता ही लढाई जनतेत जावून आम्ही लढू आणि जो पर्यंत या समाजांना न्याय मिळत नाही तो पर्यंत लढा देतच राहू, असेही त्यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या