Friday, April 26, 2024
Homeनगरमतांसाठी जातीजातीमध्ये भांडणे लावण्याचे काम - आ. पडळकर

मतांसाठी जातीजातीमध्ये भांडणे लावण्याचे काम – आ. पडळकर

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

राज्यात सध्या बर्‍याच घडामोडी सुरु आहेत. याकडे सर्वांनी बारकाव्याने पाहिले पाहिजे. मतांसाठी जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणारी, भांडणे लावणारी लोक आहेत. परंतु या गोष्टीचा डोळसपणे विचार केला पाहिजे. जनतेने अशा स्वार्थी प्रवृत्तीच्या लोकांपासून सावध राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आ. गोपीचंद पडवळकर यांनी केले.

- Advertisement -

शहरातील धनगरगल्ली येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण व सभागृहाचा लोकार्पण सोहळ्यात आ. पडवळकर बोलत होते. आ. मोनिका राजळे, हभप राम महाराज झिंजुर्के, भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, दिनेश लव्हाट, बापुसाहेब पाटेकर, बापुसाहेब भोसले, अशोक आहुजा, सुनील रासने, आशा गरड, कमल खेडकर, माणिक खेडकर, ताराभाऊ लोंढे, आत्माराम फुंडकर, गणेश कोरडे, भाऊसाहेब कोल्हे, रवी सुरवसे, सागर फडके, महेश फलके, अमोल काळे, लक्ष्मण भिसे, सिंधु शिंदे आदी उपस्थित होते. आ. पडवळकर म्हणाले, मुघलांनी मंदिरे उद्धवस्त केली.

त्यावेळी त्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचे काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केले. काहींनी स्वतंत्ररित्या जयंती समारंभ आयोजित करण्याचे जाहीर केले आहे. त्यात श्रद्धा व निष्ठेचा किती भाग आहे, हा संशोधनाचा विषय ठरणार आहे. मात्र त्यामागे निव्वळ राजकारण व समाजात तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न असून जनतेने अशा पद्धतीच्या राजकारणाला बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आ. राजळे म्हणाल्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याचे अनावरण व सभामंडप लोकार्पण सोहळ्याचा क्षण आनंददायी आहे. यावेळी सागर फडके यांनी दिलेल्या योगदानाचे कौतुक राजळे यांनी केले. हरिभाऊ नजन यांनी प्रास्तविक केले तर सुनील रासने यांनी आभार मानले. दीपक कुसळकर यांनी सूत्रसंचालन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या