Friday, April 26, 2024
Homeनगरअंतरवालीतून अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेऊन आरोपीस अटक करा

अंतरवालीतून अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेऊन आरोपीस अटक करा

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील अंतरवाली येथून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा तातडीने शोध घेऊन तिला घरच्यांच्या स्वाधीन करावे व अपहरण करणार्‍या आरोपीला अटक करावी, अशी मागणी धनगर समाज संघर्ष समितीने उपविभागीय पोलीस अधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य धनगर समाज संघर्ष समितीने उपविभागीय पोलीस अधीक्षक सुदर्शन मुंढे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले, दि.6 मे रोजी नेवासा तालुक्यातील मौजे अंतरवली येथून एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या घरा शेजारी राहणार्‍या दुसर्‍या धर्माच्या तरुणाने पळवून नेले असून या संदर्भात नेवासा पोलीस ठाण्यात दि.7 मे रोजी कलम 363 नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल आहे.

मुलीच्या अपहरण प्रकरणी तक्रार दाखल करूनही पोलिसांनी कारवाई न करता पीडित मुलीच्या आई-वडिलांनाच शिवीगाळ केली. स्थानिक पोलीस अधिकार्‍याने त्यांच्याकडून 1 लाख 25 हजार रुपये वसूल करून मुलींच्या घरच्यांनाच दमदाटी केल्याचा आरोप धनगर समाज संघर्ष समितीने केला आहे.

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा 24 तासाच्या आत शोध घेऊन तिला घरच्यांच्या स्वाधीन करावे व अपहरण करणार्‍या आरोपीला व त्याच्या साथीदारांना अटक करावी, अन्यथा धनगर समाज संघर्ष समितीचे वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

कारवाई करा अन्यथा आंदोलन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना भाजप नेते आ.गोपीचंद पडळकर यांनी ट्विट केले, आम्हा धनगरांची पोर. तिचे नेवासा तालुक्यातील अंतरवाली येथून अपहरण करण्यात आले. पोलिसांनी मात्र, तिच्याच वडिलांना दमदाटी केली. तुम्ही कारवाई करा, अन्यथा आम्ही आंदोलन केले आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला जबाबदार आपण राहाल, असा इशारा दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या