Thursday, April 25, 2024
Homeधुळेआ. फारूख शाह यांचा वीज कार्यालयात ठिय्या

आ. फारूख शाह यांचा वीज कार्यालयात ठिय्या

धुळे Dhule । प्रतिनिधी

शहराचा वीजपुरवठा सुरळीत (Power supply smooth) होत नाही,तोपर्यंत वीज वितरण कार्यालयातून (power distribution office) जाणार नाही. अशी भुमिका घेत आ. फारुख शाह (MLA Farooq Shah) यांनी ठिय्या मांडत आंदोलन (movement) सुरु केले. त्यामुळे वीज कंपनीचे अधिकारी (Power company officials) अडचणीत आले. कामचुकार कर्मचार्‍यांवर आजच निलंबनाची कारवाई (Suspension action) करा, अशी मागणीही आ.शाह यांनी केली. सुमारे दोन तास आमदारांचे ठिय्या आंदोलन (Theya movement) सुरु होते. आज सायंकाळपर्यंत वीज पुरवठा सुरळीत करु असे आश्वासन (Assurance) अधिकार्‍यांनी दिल्यानंतर आ.शाह यांनी कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन मागे घेतले.

- Advertisement -

शहरात गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा वारंवार खंडीत (Power outage) होत असून गेल्या दोन दिवसांपासून पावसामुळे तर वीज सात-आठ तास गायब होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे आ.फारुक शाह (MLA Farooq Shah) यांच्या नेतृत्वाखाली वीज कंपनीवर आंदोलन करण्यात आले. कंपनीच्या अधिकार्‍यांना जाब विचारत ठिय्या मांंडला. यावेळी वीज कंपनीच्या विरोधात आ.शाह यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली व त्यांना जाब विचारला.जोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत (Power supply smooth) होत नाही. तोपर्यंत मी अधिकार्‍यांना हलु देणार नाही, मी येथेच बसणार (Theya movement) अशी भुमिका आ.शाह यांनी घेतल्याने अधिकारी अडचणीत आले.कामचुकारांना आजच निलंबित करा अशी मागणी आ.शाह यांनी केली.

त्यावर वीज कंपनीचे ग्रामिणचे कार्यकारी अभियंता धनंजय भामरे आणि भीमराव म्हस्के यांनी संबंधितांना नोटीसा बजावून कारवाई करु असे आश्वासन दिले. यावेळी आंदोलकांनी वीज कंपनीच्या अधिकार्‍यांवर तक्रारींची अक्षरशः बरसात केली. वारंवार वीजपुरवठा खंडीत होणे, जादा बिल येणे, बील न भरल्यास ताबडतोेब वीजपुरवठा खंडीत करणे, याबाबतच्या तक्रारी केल्या.

पंधरा दिवसापुर्वी वीज पुरवठयाबाबत कंपनीच्या अधिकार्‍यांसोबत आढावा बैठक घेतली होती. पावसाळ्यात काय उपाययोजना राबवाव्यात याबाबत चर्चाही झाली होती. असे असतानाही परिस्थिती जैसे थै का? असा सवाल आ.शाह (MLA Farooq Shah) यांनी उपस्थित केला.

अधिक्षक अभियंता पंकज तगलपल्लेवार हजर नसल्याने व त्यांचा फोन बंद येत असल्याने आ.शाह यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी आंदोलकांच्या तक्रारी आणि आ. शाह यांची मागणी याची नोंद अभियंत्यांनी घेत ताबडतोब कारवाईला सुरुवात करु असे आश्वासन दिले.

त्यानंतर आंंदोलन मागे घेण्यात आले. सुमारे 2 तास आंदोलन सुरु होते. या आंदोलनात नगरसेवक सईद बेग, माजी नगरसेवक साबीर सैय्यद, अमिर पठाण,नासीर पठाण, आसिम मुल्ला, आसिफ शाह, जुन्नेद पठाण, हकीम अन्सारी, रियाज शाह, रफिक पठाण, शाहरुख शेख आदी सहभागी झाले होते.

आयुक्तांनाही अल्टीमेटम

महापालिकेकडून (Municipal Corporation) होणारा विस्कळीत पाणीपुरवठा (Disrupted water supply) आणि नालेसफाई वरुन आ.शाह यांनी मनपाला लक्ष्य केले. आज सकाळीच फोन करुन आयुक्तांना दोन दिवसांचा अल्टीमेटम (Ultimatum) दिला आहे. नालेसफाई आणि पाणी प्रश्नाबाबत हा अल्टीमेटम दिला असून कारवाई झाली नाही तर गुरुवारी आयुक्तांना त्यांच्या कॅबिनमध्ये बंद करु असा इशाराच आ.शाह यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या