Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याउल्हास नदी पॅटर्न राबवून गोदावरीतील पानवेलीचा प्रश्न मार्गी लावा - बनकर

उल्हास नदी पॅटर्न राबवून गोदावरीतील पानवेलीचा प्रश्न मार्गी लावा – बनकर

पिंपळगाव बसवंत | प्रतिनिधी | Pimpalgaon Baswant

नाशिक शहरातून (Nashik city) वाहणाऱ्या गोदावरी नदीमध्ये (Godavari River) नाशिक शहरातील सांडपाणी तसेच येथील औद्योगिक वसाहतीतील केमिकलयुक्त पाणी गोदावरी नदीमध्ये मिसळत असल्याने गोदावरी नदीचे दिवसेदिवस प्रदूषण वाढत आहे. या प्रदूषणामुळे गोदावरीत घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून मोठ्या प्रमाणात पानवेली पसरत आहे. त्याचा परिणाम गोदावरी नदीकाठालगत असलेल्या निफाड तालुक्यातील (Niphad Taluka)चाटोरी, सायखेडा, चांदोरी, गोंडेगाव, शिंगवे, करंजगाव, चापडगाव, कोठुरे, मांजरगाव आदी गावातील नळपाणी पुरवठा योजनांवर होत आहे. त्यामुळे शासनाने उल्हास नदी पॅटर्न राबवून गोदावरी नदीतील पानवेलीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा अशी मागणी आमदार दिलीप बनकर (MLA Dilip Bankar) यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) लक्षवेधीद्वारे केली…

- Advertisement -

महाराष्ट्र सत्तासंघर्ष : सुनावणी पूर्ण, आता लक्ष निकालाकडे; वाचा कोर्टात आज नेमकं काय घडलं?

यावेळी ते म्हणाले की, या परिसरातील नागरीकांना दुषित पाणीपुरवठा (Water Supply) होत असल्याने अनेक साथीच्या रोगांना बळी पडावे लागत आहे. गोदावरी नदीतील जलपर्णी काढण्यासह प्रदूषण रोखण्यासाठी सातत्याने महानगरपालिकेसह सबंधित विभागाकडे तक्रार करून देखील या परिसराबाबत कुठल्याही प्रकारची कार्यवाही प्रशासनाकडून केली जात नाही. गोदावरी नदीतील प्रदूषणाबाबत सातत्याने शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने गोदावरी काठालगत असलेल्या नागरिकांमध्ये शासनामध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झालेली आहे. त्यामुळे गोदावरी नदीचे प्रदूषण थांबविण्याबरोबरच औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याबाबत शासनाने कार्यवाही करावी,असेही बनकरांनी म्हटले.

किरकोळ वादातून हाणामारी; ३२ वर्षीय युवकाचा मृत्यू

पुढे ते म्हणाले की, ठाणे जिल्ह्याची (Thane District) जीवनवाहिनी समजली जाणाऱ्या उल्हास नदीतून (Ulhas River) पाच मोठ्या महापालिका पाणी उचलतात. या नदीपात्रात नेरळच्या सगुणा फाउंडेशनच्या माध्यमातून ड्रोनद्वारे जलपर्णीवर औषध फवारणी केली जात होती. याचाच परिणाम म्हणून जलपर्णी हळूहळू नाहीशी होऊन पात्र जलपर्णीमुक्त झाले. जलपर्णी निर्मूलनासाठी नदीत एक रसायन फवारण्यात आले. देशातील काही नद्यांमध्ये हा प्रयोग करण्यात आल्याचे सांगण्यात येते. या प्रयोगामुळे साधारणपणे ३ वर्षे जलपर्णींची वाढ होत नाही. हाच प्रयोग नाशिकच्या गोदावरी नदीपात्रातील जलपर्णीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी करावा. आणि नाशिक महानगरपालिका व नगरपालिकेच्या हद्दीतील ज्या कंपन्या आपले दूषित पाणी नदीपात्रात सोडतात अश्या कंपन्यांवर व महानगरपालिकेवर कारवाई करावी अशी मागणीही आमदार बनकर यांनी केली.

नाशिक-मुंबई महामार्गावरून जाताय? आधी ही बातमी वाचा

दरम्यान, आमदार बनकर यांनी लक्षवेधी सुचनेव्दारे उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गोदावरी नदीपात्रातील जलपर्णी कायमस्वरूपी विल्हेवाट लावण्यासाठी नदीपात्रात उल्हासनगरच्या धर्तीवर तातडीने हर्बल फवारणी करण्याच्या सूचना नाशिक महानगरपालिकेसह, जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिल्या आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या