Saturday, April 27, 2024
Homeनगरशासनाच्या योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहचवाव्यात

शासनाच्या योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहचवाव्यात

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

वादळी पावसामुळे कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन काढणीला आलेली पिके भुईसपाट झाल्यामुळे

- Advertisement -

शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. संकटाच्यावेळी शेतकर्‍यांना मदतीचा हात देण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून कृषी विभागाने महाविकास आघाडी सरकार शेतकर्‍यांसाठी राबवीत असलेल्या योजना तळागाळातील शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवाव्यात अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी कृषी विभागाला दिल्या आहेत.

आ.आशुतोष काळे यांनी अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीचे करण्यात आलेल्या पंचनाम्याचा आढावा घेण्यासाठी कोपरगाव तहसील कार्यालय व राहाता तहसील कार्यालय येथे कृषी विभाग व विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली.

बैठकीत मतदार संघात वादळी पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीचा व केलेल्या पंचनाम्याची काळे यांनी माहिती घेतली. तसेच मतदार संघातील शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या थकीत अनुदानाबाबतचा कृषी विभागाच्या अधिकार्‍यांकडून आढावा घेतला. शेतकर्‍यांना येणार्‍या अडचणी सोडविण्यासाठी कृषी सहाय्यकांनी आपल्या कार्यक्षेत्रात नियमित उपस्थित राहावे.

शेतकर्‍यांना येणार्‍या अडचणी कृषी विभागाने वेळेत सोडवाव्यात. तसेच हलगर्जीपणा आढळून आल्यास गय केली जाणार नाही असा इशारा आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी दिला. यावेळी कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे, राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे, सभापती पौर्णिमाताई जगधने, काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, उपसभापती अर्जुन काळे, गोरक्षनाथ जामदार, संचालक सचिन आव्हाड, दिलीप शिंदे, गणेश घाटे, विठ्ठल जावळे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,

तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, पंचायत समिती कृषी अधिकारी पंडितराव वाघिरे, राहात्याचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, कृषी अधिकारी श्री. शिंदे, गौतम सहकारी बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते, वाकडीचे सरपंच डॉ. संपत शेळके, दत्तात्रय कोते, विष्णू वाघ, नंदकुमार सदाफळ, ज्ञानदेव धनवटे, सचिन धोर्डे, संजय धनवटे, अण्णासाहेब कोते, अशोक काळे, अरुण बोंबले, दिलीप चौधरी,

शिवाजी साबदे, राजेंद्र धनवटे, खंडेराव वहाडणे, बाबासाहेब नळे, पद्मकांत सुराळकर, पोपट बरवंत, बाबासाहेब वाघ, महेश जाधव, ज्ञानेश्वर वर्पे, नितीन वाकचौरे, सुनील कुरकुटे, रंजित बोठे, मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व सर्व कृषी सहाय्यक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या