Thursday, April 25, 2024
Homeजळगावना.अंबादास दानवे यांचा आरोप : शिंदे सरकार शेतकरी विरोधी

ना.अंबादास दानवे यांचा आरोप : शिंदे सरकार शेतकरी विरोधी

पाचोरा Pachora प्रतिनिधी

आजचे सरकार (Govt) आहे ते शेतकऱ्याच्या विरोधी (Opponents of the farmer) सरकार आहे. मुंबईहून अहमदाबादला जाण्यासाठी बुलेट ट्रेन (Bullet train) साठी दहा हजार कोटी मंजूर (Ten thousand crores approved) झाले. परंतु अतिवृष्टी (heavy rain) व प्रोत्साहन भत्यासाठी यादी तयार आहे का? अनुदान (grant) गरजवंतापर्यंत पोहचले की नाही याकडे पाहायला सरकारला वेळच नाही. असा घणाघात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे  आमदार तथा राज्याचे विरोधीपक्ष नेते ना.अंबादास दानवे (Opposition Leader MLA Ambadas Danve) यांनी आज पाचोरा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

- Advertisement -

विरोधीपक्ष नेते ना.अंबादास दानवे जळगांव जिल्हा जिल्हा दौऱ्या वर आहेत. त्यांनी  पाचोरा येथे राजकीय दौऱ्यात  सेनेच्या नेत्या वैशालीताई  सुर्यवंशी यांचे शिवतीर्थ संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट देत   पत्रकार परिषदेत शिंदे सरकारच्या कार्यशैली वर गंभिर आरोप करत टीका केली.

  नुकतेच पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथे बनावट खताचा साठा जप्त झाला. हे सरकारच डुप्लिकेट आहे, तर खते का डुप्लिकेट राहणार नाहीत. ऐन दिवाळीत सर्वसामान्यांना रेशन दुकानाच्या माध्यमातुन मिळणार्‍या आनंदाच्या शिध्याची अद्याप बर्‍याच गावांना वाटप झाली नाही.काहींना दोन वस्तु मिळाल्या तर काही अजुनही प्रतिक्षेत आहेत. आजचे सरकार आहे ते शेतकऱ्याच्या विरोधी सरकार आहे. मुंबईहून अहमदाबादला जाण्यासाठी बुलेट ट्रेन साठी दहा हजार कोटी मंजूर झाले. परंतु अतिवृष्टी व प्रोत्साहन भत्यासाठी यादी तयार आहे का? अनुदान गरजवंतापर्यंत पोहचले की नाही याकडे पाहायला सरकारला वेळच नाही.

न्यायालयाच्या लढाईचा निकाल केंव्हाही लागु शकतो  शिवसैनिकांनी आतापासूनच तयारीला लागा केव्हाही निवडणुकीला सामोरे जावे लागेल असे शिवसेनेचे विरोधी पक्षनेते ना.अंबादास दानवे यांनी  संवाद साधतांना अवाहन केले.

यावेळी शिवसेनेच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी,  संभाजीनगर जिल्हा प्रमुख राजू राठोड,  जळगांव जिल्हाप्रमुख डॉ हर्षल माने, शेतकरी सेने जिल्हाप्रमुख अरुण पाटील, उपजिल्हाप्रमुख अँड अभय पाटील, युवा तालुका प्रमुख शरद पाटील, रमेश बाफना, भरत खंडेलवाल, हरिष देवरे ,प्रिंतेश जैन, उद्धव मराठे, राजेंद्र पाटील, पपु जाधव, पप्पु राजपुत, अजय पाटिल आदी प्रमुख पदाधिकार्‍यासह शिवसैनिक उपस्थित होते.

पाडळसरेत देव खोपडीत ठेवून पूजन

यावेळी रमेश बाफणा यांनी प्रास्ताविकात मतदार संघासह राजकिय व सध्यस्थितीची माहीती दिली. डाॅ.हर्षल माने यांनी शिवसैनिकांनी पक्षसंघटनेकडे लक्ष द्यावे असे अवाहन केले तर वैशालीताई सुर्यवंशी यांनी मनोगतात ना.आंबादास दानवे यांना पाचोरा मतदार संघात आपण स्वतः लक्ष घालून आम्हाला प्रेरणा आणि मार्गदर्शन करण्याचे अवाहन करित मतदार संघातिल शेतकर्‍यांचा प्रश्न विधिमंडळात मांडावा अशी मागणी केली.

Photos # संतनगरीत उसळली भक्तांची गर्दी

यावेळी बोलतांना ना.दानवे म्हणाले की,मी महाराष्ट्रात फिरत असताना जाणवत आहे फक्त थोडासा मनात आत्मविश्वास बाळगण्याची गरज आहे. मी ठाणे मतदार संघात देखील फिरलो 10% देखील शिवसैनिक गेलेले नाहीत. खऱ्या हाडाचे शिवसैनिक आपल्या सोबत आहे. जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरा शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल याच्यावर लक्ष केंद्रित करा. असे शिवसैनिकांना महाराष्टाचे शिवसेनैचे विरोधिपक्ष नेते ना.अंबादास दानवे यांनी भावनिक अवाहन केले.यावेळी पाचोरा भडगाव तालुका शिवसेनेच्या वतीने ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी व शेतकर्‍यांच्या विविध समस्ला सोडविण्यासाठि निवेदन देण्यात आले. सूत्रसंचालन  व आभार अँड अभय पाटील यांनी केले.

विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात पदवीसाठी विलंबशुल्कासह १५ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज

- Advertisment -

ताज्या बातम्या