Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाभारतीय क्रिकेट जगतावर 'राज' करणाऱ्या 'मिताली'चा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुडबाय

भारतीय क्रिकेट जगतावर ‘राज’ करणाऱ्या ‘मिताली’चा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुडबाय

भारताची माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज मिताली राजने सर्वप्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली.

सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये मितालीने लिहिले की, मी अगदी लहान मुलगी होते तेव्हा मी निळी जर्सी परिधान करून आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केलं होतं. हा प्रवास खूप मोठा होता. या काळात विविध प्रकारचे क्षण मला अनुभवायला, पाहायला मिळाले.

- Advertisement -

गेली २३ वर्षे माझ्या जीवनातील सर्वात उत्तम क्षणांपैका होती. प्रत्येक प्रवासाप्रमाणे हा प्रवासही आता थांबत आहे. आज मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व प्रकारांमधून निवृत्तीची घोषणा करत आहे.

२६ जून १९९९ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मिताली राजनं मार्च २०२२ पर्यंत आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यादरम्यान तिनं १२ कसोटी सामने, २३२ एकदिवसीय आणि ८९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

१२ कसोटी सामन्यांमध्ये तिनं १ शतक आणि ४ अर्धशतकांसह ६९९ धावा केल्या, तर एकदिवसीय सामन्यांमध्ये तिनं ७ शतकं आणि ६४ अर्धशतकांसह ७८०५ धावा केल्या. त्याचवेळी तिनं १७ अर्धशतकांच्या जोरावर टी-20 क्रिकेटमध्ये २३६४ धावा केल्या आहेत.

मात्र महिला क्रिकेटचा सचिन तेंडुलकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिताली राजचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अधुरेच राहिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या