Thursday, April 25, 2024
Homeनाशिकभाजपकडून ईडी, सीबीआय गैरवापर: मेहबुब शेख

भाजपकडून ईडी, सीबीआय गैरवापर: मेहबुब शेख

ओझर। वार्ताहर | Ozar

जाणते राजे शरद पवार (sharad pawar) यांनी तरुणांना रोजगारासाठी (Employment) पुण्यात (pune) आयटी हब (IT Hub) उभारले. देशात फळबागा बहराव्या यासाठी त्यांना अनुदान दिले. अन्नधान्य वाढीसाठी विविध योजना राबविल्या. त्यामुळे शेतीत (farming) क्रांती झाली.

- Advertisement -

तर यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांनी ओझरला एचएएल कंपनी (HAL Company) आणून नाशिकचे (nashik) नाव जगाच्या नकाशावर झळकावले. मात्र खोटी आश्वासने देत केंद्रात सत्तेत आलेली भाजपा सत्तेचा गैरवापर करून स्वायक्त संस्था असलेल्या ईडी (ED), सीबीआय (CBI) यांना हाताशी धरुन विरोधी पक्ष (Opposition Party) संपविण्याचा प्रयत्न करत आहे.

भाजप (BJP) काळात बेरोजगारी (Unemployment) व महागाई (Inflation) वाढली असून जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचे काम केंद्रातील सरकार करीत असल्याने शेतकरी (farmers) हिताला प्राधान्य देणारे सरकार पुन्हा सत्तेत आले पाहिजे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) विचारांच्या माणसामागे उभे रहा असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख (State President of NCP Youth Congress Mehboob Sheikh) यांनी केले आहे.

शरद युवा संवाद यात्रेनिमित्त ओझर (ozar) येथील निर्मल लॉन्सवर आयोजित कार्यक्रमात शेख बोलत होते. भाजपाने (bjp) जाती धर्मात वाद निर्माण केले. मराठवाडा विद्यापीठाचे (Marathwada University) नामांतर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar) असे करून माझ्या सारख्या सर्वसामान्य माणसाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बनवलं.

ही किमया जाणते राजे शरद पवारच करू शकतात. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पक्ष सोडताच त्यांना ईडी ची नोटीस (Notice of ED), गृहराज्य मंत्र्यांच्या घरावर जप्ती, राजकारण्यांपासून देशावर आलेल्या सर्व संकटात धावून जाणारे शरद पवार (sharad pawar) आहे असेही शेख म्हणाले.

यावेळी आमदार बनकर म्हणाले की, राष्ट्रवादी हा सर्व जाती-धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालणारा पक्ष आहे. ओझरला नगरपरिषद येत आहे. चार-सहा महिन्यात निवडणूक लागेल त्यामुळे ही नगरपरिषद राष्ट्रवादीच्या हातात द्या. ओझरचा सर्वांगिण विकास करण्याचा शब्द मी देतो. लवकरच येथे सक्षम सीओची नेमणूक करणार आहे. मात्र जाती-जातीत विष पेरण्याचे काम करणार्‍यांना मतदारांनी वेळीच धडा शिकवावा असेही बनकर म्हणाले. यावेळी राजेंद्र डोखळे म्हणाले की, तालुक्यात 15 हजारांच्या मतांनी निवडून येण्याचे ज्यांनी आव्हान दिले होते त्यांनाच दिलीप बनकरांनी धोबी पछाड दिला.

आता पुढील निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये युवकांची मोठी फळी निर्माण झाली असून पक्षाची ताकद वाढली आहे. पक्षाच्या माध्यमातून वंचित कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असेही डोखळे म्हणाले. आपल्या मनोगतात माजी सरपंच राजेंद्र शिंदे म्हणाले की, एचएएल खासगीकरणाचा जो घाट घातला आहे तो हाणून पाडला जाईल. ओझर नगरपरिषदेच्या बाबतीत बाप मिक मागू देईना आई पदर पसरू देईना अशी गत झाली असून भविष्यात रोजगाराचा प्रश्न हाती घेऊन तो सोडविला जाईल.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, रायुकाँचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, राष्ट्रवादीच्या महिला नेत्या अश्विनी मोगल, जि.प. सदस्य सिद्धार्थ वनारसे, सुरेश कमानकर, गणेश बनकर, नगरसेवक सागर कुंदे, निवृत्ती धनवटे, स्वाती कमानकर, तालुकाध्यक्ष भूषण शिंदे यांनीही मनोगत व्यक्त करुन गावागावात पक्ष बळकट करण्यावर भर देणार असल्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी विशाल भडके, सचिन पिंगळे, वसंत गवळी, भारत पगार, विजय शिंदे, शरद सिन्नरकर, दिलीप कदम, संदीप अक्कर, रऊफ पटेल, नितीन रास्कर, संतोष चौधरी, विकास कुटे, विनोद विधाते, आशुतोष कदम, शरद गायकवाड, पवन जगझाप, सुहास शिंदे, रमेश मंडलिक, रत्नाकर कदम, एचएल कामगार संघटनेेचे सरचिटणिस संजय कुटे, अनिल मंडलिक, कमलेश बनकर, सोमनाथ जाधव, नितीन पाटील, अश्याक बागवान, प्रतीप गोळेसर, हेमंत ठाकूर, नरेंद्र खैरनार, राहूल कोळपकर, जयराम पगारे, प्रकाश शेळके, धनंजय भंडारे, संदिप कातकाडे आदींसह युवक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या