Saturday, April 27, 2024
Homeनाशिकभारतीय जैन संघटनेतर्फे लसीकरण मोहिमेची सांगता

भारतीय जैन संघटनेतर्फे लसीकरण मोहिमेची सांगता

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

करोनावर (Corona) मात करण्यासाठी भारतीय जैन संघटना (bhartiy jain sanghatna) या स्वयंसेवी संस्थेने २०२० पासून रचनात्मक व सर्वव्यापी कार्य केले आहे…

- Advertisement -

नागरिकांची लसीकरणापूर्वी अँटीजेन (Antigen) किंवा आरटीपीसीआर (RTPCR) चाचणी होऊन त्यातून पॉझिटिव्ह रुग्णांना (Corona Positive) हुडकून त्यांना आवश्यक सल्ला व उपचार उपलब्ध करून देणे.

निगेटिव्ह व्यक्तींचेच लसीकरण (Vaccination) व्हावे या संकल्पनेद्वारे एकत्रितपणे मिशन झिरो (टप्पा २) व मिशन लसीकरण हे अभियान नाशिकमहानगरपालिका व भारतीय जैन संघटना यांच्या वतीने पंचवटी, नाशिकरोड, नाशिक पश्चिम विभागात दि. १० मे २०२१ पासून सुरु करण्यात आले होते.

हे अभियान बीजेएसच्या (BJS) वतीने तूर्तास थांबविण्यात येत आहे. या कालावधीत १५ लसीकरण केंद्रांवर ५० हजार ११२ व्यक्तींच्या अँटीजेन चाचण्या होऊन त्यातून २२१ पॉझिटिव्ह रुग्णांना लवकर शोधण्यात यश येऊन त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयाकडे वर्ग करण्यात आले.

६५ हजार २५६ व्यक्तींच्या लसीकरणाकरिता केंद्रावर आलेल्या वयस्कर व विशेष व्यक्तींना सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन लसीकरण पूर्ण करण्यात आले. या अभियानास वॉटर ग्रेस कंपनी, नाशिक वॉरियर्स व शिवानंद इलेक्ट्रॉनिक्स यांचे सहकार्य लाभले.

दिंडोरी रोड (Dindori Road), पेठ रोड (Peth Road) व लासलगाव (Lasalgoan) येथील बाजार समितीच्या कांदा व भाजीपाला मार्केट यार्डात स्मार्ट हेल्मेटद्वारे (Smart Helmet) मास स्क्रिनिंग (Mass screening) या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गर्दीतील ८६६९० नागरिकांचे स्क्रिनिंग करण्यात आले.

त्यांच्या शारीरिक तापमानाची चाचणी करण्यात येऊन १०२७ संशयित रुग्णांच्या अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे गर्दीत होणारे पुढील संक्रमण थांबवून मिशन झिरो मोहिमेला बळकटी मिळाली.

भारतीय जैन संघटनेच्या (BJS) पुढाकाराने राज्यस्तरावर मोठया प्रमाणावर कार्य सुरु आहे. नाशिक शहरात फूड पॅकेट्स, किराणा सामानाचे किट, मास्क व सॅनिटायझरचे गरजूंना वेळोवेळी वितरण करण्यात आले. पहिल्या लॉकडाउनच्या काळात फिरत्या दवाखान्याद्वारे १२ हजार ३४७ रुग्णांची तपासणी करण्यात आली व त्यांना गरजेनुसार वैद्यकीय सेवा व विनामूल्य औषधे पुरविण्यात आली. त्यातून पॉझिटिव्ह रुग्ण शोधण्यात यश मिळाले.

बी.जे.एस. मिशनच्या माध्यमातून ब्लड कलेक्शनअंतर्गत मार्च ते एप्रिल २०२० दरम्यान विविध रक्तदान शिबिरांतून ४७९ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. मे ते जुलै २०२० दरम्यान नाशिक महानगरपालिकेच्या सहकार्याने ३८ हजार ४०० हून अधिक कुटुंबांना म्हणजेच १७५००० हून अधिक व्यक्तींना होमिओपॅथिक औषधांचे वाटप करण्यात आले.

मिशन झिरो (टप्पा १) अंतर्गत जुलै ते सप्टेंबर २०२० या काळात सलग ६२ दिवसात ७५ हजर १६६ व्यक्तींच्या अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या. त्यात १२ हजार ५९५ पॉझिटिव्ह रुग्णांचा लवकर शोध घेण्यात यश आले. जुलै ते सप्टेंबर २०२० दरम्यान स्मार्ट हेल्मेटद्वारे १ लाख ५१०५ व्यक्तींच्या थर्मल स्क्रीनिंगमुळे पुढील संक्रमण थांबण्यास व अधिक फ़ैलाव न होण्यास मदत झाली.

संघटनेने या शिवाय जनजागृती अभियान, तापमान व प्राणवायू प्रमाण तपासणी, आरटीपीसीआर स्वॅप चाचण्या, प्लाझमा दान, अल्प दरात एचआरसीटी-सिटी स्कॅन चाचणी, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची उपलब्धता, करोनामुळे आई वडील किंवा वडील किंवा आई गमावलेल्या इयत्ता ५ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुनर्वसनाकरिता बीजेएस वाघोली शैक्षणिक पुनर्वसन केंद्रात प्रवेश देणे असे कार्य सुरु ठेवले आहे. नाशिक मधील समूह करोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी मिशन झिरोची मदत झाली आहे.

यासाठी भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा (Shantilal Mutha), नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), महापौर सतीश कुलकर्णी (Satish Kulkarni), मनपा आयुक्त कैलास जाधव (Kailas Jadhav), विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Radhakrishna Game), जिल्हाधिकारी सूरज मांढरे (Suraj Mandhare) यांचे सहकार्य लाभले आहे.

करोनाचे संकट आटोक्यात आले असले तरीही आव्हाने संपलेली नाहीत. ३५ वर्षांपासून भारतीय जैन संघटना विविध सामाजिक उपक्रम राबवत लोकसेवेचे वसा पुढे नेत आहे. जोपर्यंत करोनावर संपूर्ण विजय मिळवून त्याला हद्दपार करीत नाही तो पर्यंत सेवाकार्य अखंडितपणे सुरु राहील, असे बीजेएसचे राज्य प्रभारी व प्रकल्प संचालक नंदकिशोर साखला यांनी सांगितले.

अभियानाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. राजेंद्र त्र्यंबके, डॉ. आवेश पलोड, सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिता साळुंके, करोना नोडल अधिकारी डॉ. विजय देवकर, डॉ. जितेंद्र धनेश्वर, डॉ. चारुदत्त जगताप, डॉ. कल्याणी होळकर, दीपक चोपडा, ललित सुराणा, अभय ब्रम्हेचा, अमित बोरा, गोटू चोरडिया, गौतम हिरन, रवींद्र चोपडा, रोशन टाटीया, वॉटर ग्रेसचे चेतन बोरा, नाशिक वॉरियर्सचे नरेंद्र गोलिया, गोपाल अटल, रामेश्वर मालानी, राजा जॉली, विनोद गणेरीवाल, ओम रुंगठा, शिवानंद इलेक्ट्रॉनिक्सचे एम. के. बिरमानी, स्वामी समर्थ मंदिर रविवार पेठचे अॅड. राजेंद्र लोढा यांनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या