Friday, April 26, 2024
Homeजळगावआशादीप वसतीगृहातील बेपत्ता महिला मुक्ताईनगर शहरात सापडली

आशादीप वसतीगृहातील बेपत्ता महिला मुक्ताईनगर शहरात सापडली

जळगाव jalgaon

शहरातील गणेश कॉलनी येथील शासकीय आशादीप वसतीगृहात In Government Ashadeep Hostelदाखल असलेली ४० वर्षीय पिडीत बेपत्ता झाल्याची घटना शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास समोर आली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. या घटनेने आशादीप वसतीगृहाचा कारभार रामभरोसे असल्याचे समोर आले होते. दरम्यान बेपत्ता झालेली महिला सोमवारी मुक्ताईनगर शहरात सापडली आहे.

- Advertisement -

मुक्ताईनगर पोलिसांची सतर्कता, महिला सापडली

रावेर पोलिसांनी गणेश कॉलनी येथील शासकीय आशादीप वसतीगृहात ४० वर्षीय महिलेला मे महिन्यात दाखल केले होते. ७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ही महिला कोणाला काही एक न सांगता आशादीप वसतीगृहातून निघून गेली होती. तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून न आल्याने आशादीप वसतीगृहातील केअर टेकर सुनंदा नंदकिशोर पोतदार वय ५५ यांच्या खबरीवरुन जिल्हापेठ पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

पोलीस हेडकॉन्स्टेबल फिरोज तडवी हे करीत होते. सोमवारी सकाळी तडवी यांना मुक्ताईनगर पोलिसांनी बेपत्ता असलेली महिला मुक्ताईनगर शहरात मिळून आल्याची माहिती कळविली. तिला मुक्ताई मंदिरात ठेवण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे तपासअधिकारी फिरोज तडवी यांनी मुक्ताईनगर गाठले. तिची वैद्यकीय तपासणी करुन तिला ताब्यात तसेच तिचा जबाब नोंदवून, आशादीप वसतीगृह प्रशासनाच्या ताब्यात देण्याची कारवाई उशीरापर्यंत सुरु होती.

कर्मचार्‍यांचा जीव भांड्यात पडला

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी आशादीप वसतीगृहाची बदनामी झाल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे. आता पुन्हा याठिकाणी सुरक्षा रक्षक, केअर टेकरसह इतर कर्मचारी असतांना महिला कशी काय बेपत्ता झाली, असा प्रश्‍न उपस्थित होत असून आशादीप वसतीगृहाचा कारभार रामभरोसे असल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान बेपत्ता झालेली महिला मिळून आल्याने आशादीप वसतीगृह अधीक्षकांचाही जीव भांड्यात पडला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या