हरवलेला मुलगा महिनाभराने नातेवाईकांच्या ताब्यात

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक रोड । प्रतिनिधी Nashik

नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर (Nashik Road Railway Station) कामायनी एक्स्प्रेसमधून (Kamayani Express) उतरताना पाय घसरून पडल्यामुळे जखमी झालेल्या मंदबुद्धी परप्रांतीय तरुणाची महिनाभराने पुन्हा कुटुंबीयांशी भेट झाली व कुटुंबीयांनी सर्वांचे आभार मानले.

या मुलाचे पालक शोधणे हे रेल्वे पोलिसांपुढे (Railway Police) आव्हान होते. त्याला परस्पर वेड्यांच्या इस्पितळात दाखल न करता त्याच्या नातेवाईकांचा योग्य प्रकारे शोध घेतल्याने रेल्वे पोलिसांचे अभिनंदन होत आहे.

याबाबत रेल्वे पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की 24 ऑगस्ट रोजी नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर पाणी पिण्यासाठी उतरताना परसंजित मंडल (19, रा. मिस्त्रीटोला, जि. साहिबगंज, झारखंड) हा मुलगा रेल्वेतून पडून जखमी झाला. त्याच्यावर रेल्वे पोलिसांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात (District Government Hospital) उपचार केले. यादरम्यान स्पष्ट झाले, की हा मुलगा मंदबुद्धी असून, परप्रांतीय आहे.

त्याला धड बोलताही येत नव्हते; मात्र रेल्वे पोलिसांनी त्याच्या तुटक बोलण्यावरून हा मुलगा मिस्त्रीटोला येथील रहिवासी असल्याचे शोधून काढले. त्यानुसार झारखंडमध्ये पोलीस यंत्रणेतून संपर्क साधला असता महिनाभरापासून हा मुलगा बेपत्ता असल्याचे समजले. या मुलास त्याचे नातेवाईक रवीन मंडल यांनी मुंबईहून (Mumbai) कामाख्या एक्स्प्रेसमध्ये (Kamakhya Express) बसविण्याऐवजी कामायनी एक्स्प्रेसमध्ये बसविल्याने रेल्वेची चुकामूक झाली.

दरम्यान, हा मुलगा नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर पाणी पिण्यासाठी उतरला असता पाय घसरून त्याचा अपघात झाला, असे स्पष्ट झाले. औरंगाबाद लोहमार्ग पोलीस दलाच्या (Aurangabad Railway Police Force) नवनियुक्त पोलीस अधीक्षिका मोक्षदा पाटील (Superintendent of Police Mokshada Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड रेल्वे स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी शेंडगे, अंमलदार संतोष उफाडे,

विजय कपिले, शैलेश पाटील, सुभाष कुलकर्णी, चंद्रकांत उबाळे आदींच्या पथकाने या सर्व प्रकरणाचा तपास करून हरविलेल्या युवकास (Missing boy) नातेवाईकांच्या ताब्यात दिले. या कार्यात जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टर व इतर कर्मचारी, स्थानिक स्वयंसेवी संस्थाचे सहकार्य लाभले. याबद्दल परसंजितचे वडील संजय मंडल यांनी सर्वांचे आभार मानले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *