Friday, April 26, 2024
Homeनगरमहावितरणचा गलथान कारभार; बारा दिवसानंतरही मेंगाळ कुटुंबाला मदत मिळेना...

महावितरणचा गलथान कारभार; बारा दिवसानंतरही मेंगाळ कुटुंबाला मदत मिळेना…

संगमनेर (तालुका प्रतिनिधी)

बारा दिवसांपूर्वी वादळी वाऱ्याने विजवाहक तार तुटून थेट खाली खेळत असलेल्या चिमुकल्याचा अंगावर पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथे घडली होती. मात्र आता चिमुकल्याच्या कुटुंबाला मदत देण्यासाठी विजवितरण कंपनीचे अधिकारी उडवा उडवीचे उत्तरे देत आहे.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की चंदनापुरी येथे गुरुवार( ता.४) मे रोजी दुपारी अवकाळीपावसासह वादळी- वाऱ्याने विजवाहक तार तुटून थेट घराच्या पाठीमागे खेळत असलेल्या अजित गोकुळ मेगांळ या सात वर्षीय चिमुकल्याचा अंगावर पडून त्याचा जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे सर्वांनी हळहळ व्यक्त केली.

पोहण्याचा मोह जीवावर बेतला, खडकवासला धरणात नऊ मुली बुडाल्या…

परंतु या घटनेला बारा दिवसांचा कालावधी उलटूनही अद्याप महावितरण कंपनीने कुठल्याच प्रकारची मदत या कुटुंबाला दिली नाही.ऊलट विचारणा केली असता अधिकारी ऊडवा उडवीचे उत्तरे देत आहे.त्यामुळे या मुजोर अधिकाऱ्यांवर कुणाचाच वचक आहे की नाय असा प्रश्नही आता निर्माण झाला आहे.

महावितरणच्या नियमाप्रमाणे जर विद्युत वाहक तार कुणाच्या अंगावर पडून त्यात मृत्यू झाला तर संबंधित कुटुंबाला महावितरण कडून साधारणपणे चार लाख रुपयांची मदत दिली जाते.मात्र त्या अगोदर तातडीची मदत म्हणून वीस हजार रुपये तात्काळ दिले जात असतात.हा सर्व अधिकार कार्यकारी अभियंता यांचा असतो परंतु मेंगाळ कुटुंबाला अद्याप तरी काहीच मदत दिली नाही.

Monsoon Update : महाराष्ट्रात मान्सून केव्हा येणार? हवामान विभागाने दिली महत्वाची बातमी

यासंदर्भात महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मेंगाळ कुटुंबाकडून अजून माझ्याकडे कागदपत्रे आलेली नाहीत, आज देतो उद्या देतो असं सांगून थोरात यांनी वेळ मारुण नेली. त्यामुळे त्या कुटुंबातील मुलाचा मृत्यू होऊनही कंपनीकडून त्या कुटुंबाची चेष्टा केली जात आहे.त्यामुळे या प्रकरणात महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.

चंदनापुरी येथे विजवाहक तार तुटून अंगावर पडल्याने सात वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती वास्तविक पाहता त्या मेंगाळ कुटुंबाला मदत मिळणे गरजेचे होते मात्र विजवितरण कंपनीचे संवेदना नसलेले उपकार्यकारी अभियंता यांनी या घटनेकडे पूर्णपने दुर्लक्ष केले. कुठल्याच कागदपत्रांचा पाठपुरवा केला नाही त्यामुळे बारा दिवसानंतरही मेंगाळ कुटुंब हे मदतीपासून वंचित आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या