दहशत माजवणाऱ्या टवाळखोरांना अवघ्या अर्ध्या तासात अटक

jalgaon-digital
2 Min Read

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

अंबड पोलीस ठाण्याच्या Ambad Police Station हद्दीत शुभम पार्क Shubham Park- New Nashik परिसरामध्ये मद्यधुंद अवस्थेत दहशत माजवत असताना काही गाड्यांसह नगरसेविका च्या दुकानाच्या बाहेर असलेल्या गाड्यांंची तोडफोड Vandalism करत असलेल्या टवाळखोरांना पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात सापळा रचून अटक केली.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज (दि 9) सायंकाळच्या सुमारास काही टवाळखोरांमध्ये मध्ये आपापसात भांडणे झाले. त्या भांडणाचे रूपांतर त्यांनी दहशदीमध्ये मध्ये केले. त्यांनी हातात कोयते घेऊन काही गाड्यांच्या काचा फोडल्या तसेच भाजप नगरसेविका छाया देवांग यांच्या दुकानाबाहेर असलेल्या हातगाडीवर देखील त्यांनी हमला केला.

मात्र हे करत असताना अंबड पोलीस ठाण्याला निनावी फोन आला. यातूनच पोलिसांनी घटनास्थळी येत चौकशी केली असता सदर टवाळखोर हे पळून गेले होते, मात्र पोलिसांनी खबऱ्यांच्या माध्यमातून सूत्र लावून वैभव रणजीत लोखंडे (19,रा. रिगल अष्टविनायक बिल्डिंग, फ्लॅट नंबर 15, अंबड ), वैभव गजानन किरकाडे ( 28,रा. उमराळे बुद्रुक नाशिक, सध्या रा. भाग्यलक्ष्मी रो हाऊस नंबर 3 मेहरधाम पंचवटी ) अविनाश शिवाजी गायकवाड ( 32, शुभम पार्क बिल्डिंग नंबर 7, फ्लॅट नंबर 32, अंबड ) यांना त्यांच्याकडे असलेल्या लोखंडी कोयत्यासह अवघ्या अर्ध्या तासाच्या आत पोलिसांनी ताब्यात घेत वपोनी भगीरथ देशमुख यांच्या समक्ष हजर केले.

ही मोहीम वपोनी भगीरथ देशमुख ,पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सपोनी गणेश शिंदे, अंमलदार प्रशांत नागरे, किरण गायकवाड, अनिरुद्ध येवले, नितीन सानप, हेमंत आहेर, मच्छिंद्र वाकचौरे, जनार्दन ढाकणे, प्रमोद काशीद, योगेश शिरसाठ, मुकेश गांगुर्डे, तुळशीराम जाधव यांनी यशस्वीरित्या राबविली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *