Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यामिसळ पार्ट्यांना जिल्ह्यात उधाण

मिसळ पार्ट्यांना जिल्ह्यात उधाण

नाशिक । विजय गिते

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांमुळे चांगलाच राजकीय धुरळा उडत आहे. येत्या काही दिवसांत नगरपंचायतीच्या निवडणुकांचा फडही रंगणार आहे. या निवडणुका नजरेसमोर ठेऊन जिल्ह्यात विविध ठिकाणी सध्या ममिसळ पार्ट्यांफना उधाण आले आहे. राजकारणाचा हा नवा फंडा ग्रामीण भागात रुजू लागला आहे.

- Advertisement -

परंपरागतपणे आपलेच असलेले, मात्र काही कारणाने नाराज होऊन दुरावलेले कार्यकर्ते आणि पक्षाच्या पदाधिकार्‍यांना आपलेसे करण्यासाठी मिसळ पार्टीचा सोपा आणि जवळचा मार्ग स्वीकारला जात असल्याचे जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे. दुखावलेले कार्यकर्ते आणि मित्रांना पुन्हा आपलेसे करून जवळ आणण्यासाठी ममिसळ पार्टीफ हा पर्याय राजकीय लोकांना मिळाला आहे. विविध ठिकाणी मिसळ पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. राजकीय लाभ मिळवण्यासाठी कार्यकर्ते जोडणे हाच या मागचा मुख्य उद्देश असल्याचे लपून राहिलेले नाही.

सन 2020 मध्ये प्रत्येकाला विविध समस्यांना सामोरे जावे लागले. त्यातून सावरत नव्या वर्षात जगण्याची नवी उमेद आणि नवी ऊर्जा घेऊन काम सुरु केले जात आहे. ते करताना समाजातील सर्वांनाच एकत्र आणून मिसळ पार्टीच्या रूपाने कौटुंबिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुका आणि आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाव आणि शहरातील राजकीय वातावरण अधिक सुदृढ रहावे व निवडणुका खेळीमेळीच्या वातावरणात पार पडाव्यात यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मिसळ पार्ट्या हा त्याच प्रयत्नांचा भाग असल्याचे बोलले जात आहे.

आपुलकीचे शब्द

खिलाडूवृत्तीचे दर्शन प्रत्येकाच्या आचरणातून घडावे, त्यातून सामाजिक ऐक्य अधिक दृढ व्हावे, राजकारणापलीकडे जाऊन गावविकासासाठी नवी वाटचाल करावी, ज्येष्ठ-श्रेष्ठांच्या मार्गदर्शनाने उज्ज्वल भविष्यासाठी तयार होऊया. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीने जीवन अधिक सुंदर करूया, यांसारखे शब्द वापरून मिसळ पार्ट्यांची आमंत्रणे विविध पक्षांची नेते मंडळी आणि उमेदवारांना दिली जात आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या