Friday, April 26, 2024
Homeनंदुरबार‘मिरर राईटींग’ची इंटरनॅशनल वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

‘मिरर राईटींग’ची इंटरनॅशनल वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

म्हसावद । वार्ताहर- MHASAVAD

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन कालावधीचा सदुपयोग करून म्हसावद येथील शिक्षकाने 20 तास 15 मिनीटात संस्कृत मधील श्रीमद भगवतगीता व श्री हनुमान चालीसा उलट्या अक्षरात (मिरर राईटींग) लिहून अनोखा विक्रम केला आहे…

- Advertisement -

त्या विक्रमाची नोंद इंटरनॅशनल वंडर बुक ऑफ रेकॉर्ड या पुस्तकात करण्यात आली आहे.

म्हसावद,ता.शहादा येथील प.पू. सती गोदावरी माता माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व पत्रकार सुधाकर पाटील यांनी कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन कालावधीचा सदुपयोग करून घेतला. त्यांनी 2 एप्रिल 2020 (श्री रामनवमी) ते 8 एप्रिल 2020 (श्री हनुमान जयंती) या सात दिवसाच्या काळात 20 तास 15 मिनीटे घेवून संस्कृत मधील श्रीमद भगवतगीता व श्री हनुमान चालीसा उलट्या अक्षरात (मिरर राईटींग) लिहून अनोखा विक्रम केला आहे.

या अनोख्या विक्रमाची दखल घेवून देशपातळीवर असलेल्या इंटरनॅशनल वंडर बुक ऑफ रेकॉर्ड या पुस्तकात अप्रतिम विक्रम व रिफ्लेक्टर राईटर म्हणून नोंद करण्यात आली आहे. त्यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, मेडल, बॅज देवून गौरविण्यात आले.

त्यांना वेळोवेळी वंडर बुक ऑफ रेकॉर्डचे हैदराबाद येथील मुख्य समन्वयक लॉयन बिंगी नरेंद्र गौड, समन्वयक डॉ. स्वर्णश्री गुर्राम यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा गुजर, म्हसावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पवार, पी.एस.आय. देविदास सोनवणे यांचे सहकार्य लाभले.

- Advertisment -

ताज्या बातम्या