Thursday, April 25, 2024
Homeनगरराहुरी तालुक्यातून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

राहुरी तालुक्यातून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील विद्यापीठ परिसरात दहावीचे पेपर दिल्यानंतर दोन अल्पवयीन मुलींचे अज्ञात तरुणांनी अपहरण केल्याची घटना 25 मार्च रोजी घडली असून या घटनेमुळे पालक वर्गात चिंतेचे व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

या घटनेतील दोन्ही अल्पवयीन मुली एकाच वर्गात शिक्षण घेत होत्या. त्या दोघी शनिवारी दहावीचा पेपर देण्यासाठी विद्यापीठ येथे गेल्या होत्या. त्या दोघी उशीरापर्यंत घरी परत आल्या नाहीत. त्यामुळे घरच्या लोकांनी त्यांचा परिसरात शोध घेतला. मात्र, त्या मिळून आल्या नाहीत.

सदर दोन्ही अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेले असल्याबाबत मुलींच्या नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला.त्या मुलींच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून अज्ञात तरुणां विरोधात गुन्हा रजि. नं. 327/2023 भादंवि कलम 363 प्रमाणे अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या