Friday, April 26, 2024
Homeनगरदोन अल्पवयीन मुलींना पळवून नेणार्‍या आरोपींच्या 2 साथीदारांना अटक

दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेणार्‍या आरोपींच्या 2 साथीदारांना अटक

लोणी |वार्ताहर| Loni

अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणार्‍या राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथील आरोपींच्या दोन साथीदारांना लोणी पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

- Advertisement -

दाढ बुद्रुक येथील आकाश सुनील पाळंदे व हृतिक भाऊसाहेब मकवाने या दोन आरोपींनी पाच दिवसांपूर्वी नववी व दहावीमध्ये शिकणार्‍या दोन अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेत त्यांचे लैंगिक शोषण केले होते. लोणी पोलिसांनी गुन्हा घडल्यावर चोवीस तासात आरोपी जेरबंद करून मुली परत आणल्या होत्या. अटक केलेल्या आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. आरोपी पोलीस कोठडीत असताना त्यांच्या चौकशीत या गुन्ह्यासाठी मदत करणार्‍यांची नावे समोर आली. वैभव मच्छिंद्र सातपुते, रा. दाढ बुद्रुक व रोहित बिरु मुळेकर, रा. परदेशवाडी, ता. इगतपुरी हल्ली रा. दाढ बुद्रूक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

वैभव सातपुते याने आरोपींना मोबाईलचे सिमकार्ड काढून देण्यास मदत केली तर रोहित मुळेकर याने इगतपुरी-भंडारदरा रस्त्यावरील एका गावात आरोपींना राहण्याची व्यवस्था केली. रोहित सध्या दाढ बुद्रुक येथेच राहत असून त्याच्या मूळ गावाजवळच राहण्यासाठी त्याने आरोपींची मदत केली. याच ठिकाणी मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आले होते.

पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. लोणीचे सपोनि युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश शिंदे व त्यांच्या सहकार्‍यांनी सर्व आरोपी तातडीने अटक करण्यात विशेष मोहीम राबविली.

- Advertisment -

ताज्या बातम्या