Friday, April 26, 2024
Homeनगरअल्पवयीन मुलाला लाकडाने मारहाण

अल्पवयीन मुलाला लाकडाने मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

येथे का बसलात, असे म्हणून एकाने अल्पवयीन मुलाला लाकडाने मारहाण करून जखमी केले. रविवारी रात्री आठ ते सव्वा आठ वाजेच्या दरम्यान अण्णाभाऊ साठे वसाहत, माळीवाडा येथे ही घटना घडली. दर्शन बाळू पठारे (वय 15 रा. माळीवाडा) असे जखमी अल्पवयीन मुलाचे नाव आहे.

- Advertisement -

त्याची आई मिरा बाळू पठारे (वय 45 रा. माळीवाडा) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारा इसम अशोक आबाजी ठोकळ (रा. माळीवाडा) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री आठ ते सव्वा आठ वाजेच्या दरम्यान दर्शन पठारे व फिर्यादी यांचा भाचा शुभम नितीन साठे हे दोघे घरासमोर गप्पा मारत असताना अशोक ठोकळ तेथे आला.

तो दर्शन आणि शुभम यांना म्हणाला,‘तुम्ही येथे का बसलात’, असे म्हणून शिवीगाळ केली. त्यावेळी दर्शन म्हणाला की,‘तुम्ही शिव्या देऊ नका’, असे म्हणाल्याचा अशोक ठोकळ याला राग आल्याने त्याने जवळच असलेले लाकूड उचलून दर्शन याच्या डोक्यात मारले. जखमी दर्शनवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या