Friday, April 26, 2024
Homeनगरउर्वरित कालखंडातही कराळे कुटुंबातील व्यक्ती जि. प. सदस्य असावी - मंत्री तनपुरे

उर्वरित कालखंडातही कराळे कुटुंबातील व्यक्ती जि. प. सदस्य असावी – मंत्री तनपुरे

करंजी |वार्ताहर| Karnaji

शिवसेनेचे गटनेते व मिरी करंजी गटाचे जिल्हा परीषद सदस्य अनिलराव कराळे यांना तिसगाव (ता. पाथर्डी) येथील वृद्धेश्वर हायस्कूलमध्ये

- Advertisement -

शनिवारी सकाळी सर्वपक्षीय शोकसभा घेवून सामुहीक आदरांजली वाहण्यात आली. माजी आमदार रावसाहेब म्हस्के व स्व. अनिल कराळे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून शोकसभेस प्रारंभ करण्यात आला.

यावेळी कराळे यांची पत्नी किंवा कुटुंबातील सदस्यालाच उर्वरित कालखंडासाठी जिल्हा परीषद सदस्य केले जावे. हीच खरी कृतीतून आदरांजली ठरेल. असा सार्वत्रिक सूर प्रसंगी उमटला. ना. प्राजक्त तनपुरे अध्यक्षस्थानी होते. सरपंच काशिनाथ लवांडे म्हणाले, ग्रामीण स्थरांवर राजकीय स्थित्यंतरात वारसा नसताना कार्यकर्ता तयार होताना घरांवर तुळशीपत्र ठेवून झुंज द्यावी लागते.

ग्रामपंचायत सदस्य ते जिल्हा परिषदेची पायरी चढताना कराळे ती भुमिका जिवंत जगले. उर्वरित कालखंडावरसुद्धा त्यांच्याच कुटुंबाचा अघोषित हक्क आहे. त्यांच्या पत्नी किंवा त्यांच्या कुटुंबातून ज्या व्यक्तीचे नाव समोर येईल. त्याला सर्वसंमती दिली जावी.

कराळे यांच्या माध्यमातून पाथर्डी तालुक्याला लाभलं होते. कराळे यांच्या कुटुंबाचे आर्थिक मदतीसह राजकीय पुनर्वसन देखील होण्याची गरज असल्याची भावना लवांडे पाटील यांनी व्यक्त केली.

यावेळी मंत्री तनपुरे म्हणाले अनिलरावांसारखा होतकरू उमदे नेतृत्व या तालुक्याला लाभलं होतं विकास कामे मार्गी लावण्याची त्यांची पद्धत अलौकिक होती. नेहमीच जमिनीवर राहून सर्वसामान्यांशी आपली नाळ जुळून ठेवणारा ज्येष्ठांचा आदर व सर्वसामांन्याचा सन्मान करणारा हा उमदा नेता आपल्यातून गेल्याने या भागाचीच नव्हे तर मतदार संघाची देखील मोठी हानी झाली असल्याची भावना व्यक्त करत कराळे यांच्या कुटुंबियांना सर्वतो मदत करण्याची ग्वाही मंत्री तनपुरे यांनी दिली.

यावेळी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, पुरुषोत्तम आठरे, गोविंदराव मोकाटे, शिवसेना तालुका अध्यक्ष अंकुश चितळे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे, माजी सभापती मिर्झा मणियार, माजी सरपंच संभाजीराव वाघ, ज्येष्ठनेते चंद्रकांत म्हस्के, पंचायत समिती सदस्य सुभाष केकान, शिवसेना नेते भगवानराव दराडे, बाबा पुढारी आदिंनी आपल्या मनोगतातून कराळे यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला.

यावेळी पंचायत समिती सदस्य सुनिल परदेशी, शंकराव उंडाळे, दिलीप गांधी, कारभारी गवळी, विजय कुटे, माजी सरपंच संतोष शिंदे, सरपंच अमोल वाघ, बाळासाहेब आकोलकर, इलियास शेख, युवा नेते सुभाषराव गवळी, जालिंदर वामन, शिवाजी मचे, सुधाकर वांढेकर, बाबा बुधवंत, माणिकराव लोंढे, लक्ष्मण बानगुडे, अनिल रांधवणे, राजेंद्र म्हस्के, भारत वाढेकर, अशोक टेमकर, कानिफ पाठक, दिलीप वांढेकर, रफिक शेख, भाऊसाहेब लवांडे, माजी सरपंच सुरेश वाघ, पृथ्वीराज आठरे, विलास टेमकर गणेश पालवे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या