Friday, April 26, 2024
Homeनगरप्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे या

प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सध्याच्या परिस्थितीत करोना बाधित रुग्णांवर प्लाझ्मा उपचार ही एक चांगली उपचार पद्धती आहे. मात्र, प्लाझ्मा दान करण्याचे प्रमाण फारच कमी असल्याने ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजक्शन प्रमाणे प्लाझ्माचा मोठ्याप्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. यासाठी प्लाझ्मा दानबाबत जनजागृती अत्यावश्यक आहे. करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत प्राण वाचवण्यासाठी जास्तीतजास्त नागरिकांनी न घाबरता प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.

- Advertisement -

बुर्‍हाणनगरच्या तुळजाभवानी मंदिराचे पुजारी अ‍ॅड. अभिषेक भगत यांनी सुरु केलेल्या प्लाझ्मा दान मोहीमेच्या जनजागृतीसाठी पुढाकर घेतला आहे. त्याअनुषंगाने राज्यमंत्री तनपुरे यांची त्यांनी भेट घेवून प्लाझ्मा दान मोहिमेत सहभागी होण्याची विनंती केली. मंत्री तनपुरे यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी अ‍ॅड. भगत यांच्या समवेत नगर शहरातील जनकल्याण रक्तपेढीला भेट देवून प्लाझा संकलनाची सविस्तर माहिती घेतली.

जनकल्याण रक्तपेढीचे व्यवस्थापक मुकेश साठ्ये यांनी त्यांना माहिती दिली. यावेळी व सामाजिक कार्यकर्ते अमोल जाधव, डॉ. गुलशन गुप्ता, सुशांत पारनेरकर उपस्थित होते. मंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले, येणार्‍या काळात करोनाचा अजून प्रादुर्भाव वाढण्यची शक्यता आहे. त्यामुळे प्लाझ्मा दान मोहिम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी या मोहिमेत सहभागी होत आहे. जिल्हा आरोग्यधिकारी व महानगरपालिका कडूनही करोनावर मात केलेल्या व्यक्तीची माहिती घेवून त्यांना वैय्यक्तिक संपर्क साधून प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या