Wednesday, April 24, 2024
Homeनगरकाळजी करु नका, लवकर बरे व्हाल...

काळजी करु नका, लवकर बरे व्हाल…

नेवासा |तालुका प्रतिनिधी|Newasa

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी तालुक्यातील शनिशिंगणापूर येथे सुरू करण्यात आलेल्या कोव्हिड केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केली.

- Advertisement -

काळजी करू नका, लवकर बरे व्हाल असा दिलासाही त्यांनी रुग्णांना दिला. शनिशिंगणापूर कोविड केअर सेंटर मधील करोना रुग्णांची संख्या, त्यांना देण्यात येणार्‍या सेवा-सुविधा व औषधोपचार याबाबद माहिती घेऊन करोना रुग्णांशी संवाद साधला. रुग्णांच्या तब्येतीची चौकशी करून काळजी करू नका, तुम्ही लवकर बरे होऊन घरी जाल असा आस्थेवाईकपणाचा व आपुलकीचा धीर दिला.

त्यानंतर त्यांनी अधिकारी वर्गांची आढावा बैठक घेतली.तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी,सोनईचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कसबे, शनिशिंगणापूर देवस्थानचे अधिकारी व डॉक्टर यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या