Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याआठवलेंचा नवा फार्म्युला : भाजपने उपमुख्यमंत्रीपद घ्यावे अन् 'या' पक्षाला पाच वर्षांसाठी...

आठवलेंचा नवा फार्म्युला : भाजपने उपमुख्यमंत्रीपद घ्यावे अन् ‘या’ पक्षाला पाच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद द्यावे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शिवशक्ती, भीमशक्तीचा प्रयोग शिवसेनेबरोबर (Shivsena) केला होता. शिवसेनेसोबत आमचे घरोब्याचे सबंध आहेत. रिपाइं ज्यांचा बरोबर जातं त्यांची सत्ता येते. हे गमक केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी सांगितले…

- Advertisement -

तसेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मुख्यमंत्री (CM) करावे, अडीच अडीच वर्षे वाटून घ्यावे अशी मागणी पूढे येत असताना आठवले यांनी आता नवा फॉर्म्यूला मांडला आहे.

भाजपने (BJP) शिवसेनेच्या सोबत जावे असे मत व्यक्त करुन भाजपने शिवसेनेला 5 वर्ष पाठिंबा देऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री ठेवण्याचा सल्ला आठवले यांनी दिला आहे. नाशिक येथे आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांची प्रकृती सुधारावी अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच करोनाचा (Corona) लढा देण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. शिवसेना आता अडीच वर्षे मुख्यमंत्री पद या फॉर्म्युलावर ऐकणार नाही, त्यामुळे भाजपने उपमुख्यमंत्री पद घ्यावे आणि शिवसेनेला पाठिंबा द्यावा, असा नवा फॉम्यूला आठवले यांनी मांडला.

दलित बहुजन समाज एकसंघ करण्याचा आमचा विचार असल्याचे सांगतानाच दलित पँथरचे पुनरुज्जीवन करणार असल्याचा सुतोवाच त्यांनी केला. येत्या निवडणूकीसाठी (Election) रिपाइंची तयारी असून, स्थानिक पातळीवर जिल्हाध्यक्षांना निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार देत असल्याचे सांगितले.

विनायक दादा पाठारे यांच्या कुटूंबीयांचे सांत्वन करताना पक्षातर्फे 51 हजारांचा धनादेश देउन कुटूंबाला आर्थिक मदत केली. सुयोग हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागाचे व लिफ्टचा शुभारंभ त्यांनी केला. येत्या निवडणूकीत रिपाइं पक्ष 5 ही राज्यात भाजपसोबत युती करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चार राज्यात भाजपाची सत्ता आहे. यंदा पाचही राज्यात सत्ता आणणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रत्यक्षात काँग्रेस पक्ष (Congress) हा खिळखिळा झाला आहे. मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढण्याचा निर्णय योग्य आहे. पण त्याचा फायदा काँग्रेसला होणार नाही. कारण काँग्रेसची ताकद कमी झालीय ही वस्तूस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.

आंबेडकर यांचे संविधान काढण्यासाठी नाही तर मजबूत करण्यासाठी मोदी सरकार (Modi Government) सत्तेवर आले असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना आजपर्यंत कुठेही अडवले गेले नाही, त्यांची सुरक्षा महत्वाची असते. हवामान खराब झाल्याने ते रस्त्याने गेले, मात्र काँग्रेसने हा प्रकार जाणून बुजून केला असल्याचा आरोप त्यांनी केला. पंजाब सरकारने मोदींच्या सुरक्षाची काळजी घ्यायला हवी होती, या प्रकरणाची सविस्तर चौकशी झाली पाहिजे अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या