Thursday, April 25, 2024
Homeनगरनफेखोर विमा कंपन्यावर वॉच

नफेखोर विमा कंपन्यावर वॉच

करंजी |वार्ताहर| karanji

शेतकर्‍यांनी पिक विम्याच्या माध्यमातून भरलेले शेकडो कोटी रुपये विमा कंपन्यांनी घशात घातल्याचे सरकारच्या लक्षात आले असून यापुढे नफेखोर विमा कंपन्यावर सरकारचा वॉच राहणार असल्याचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

पाथर्डी तालुक्यातील वैजूबाभळगाव येथे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत प्रसंगी मंत्री तनपुरे यांनी वीज, पाणीप्रश्न, रस्ते, घरकुल, रेशन यासह उपस्थित नागरिकांच समस्या ऐकून घेतल्या. नंतर संबंधित अधिकार्‍यांची चांगलीच कानउघाडणी केली. वैजूबाभळगाव येथील पाझर तलाव दुरुस्ती, घरकुलांचा रखडलेला प्रश्न, डाळिंब फळबागांचा विम्याचा प्रश्न, मिरी तिसगाव योजनेच्या पाईपलाईन दुरुस्तीची मागणी व संतभवन उभारण्यासाठी निधी मिळावा या सर्व प्रश्नांची निश्चितपणे सोडवणूक करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री तनपुरे यांनी वैजूबाभळगाव ग्रामस्थांना दिली.

या बैठकीप्रसंगी माजी सभापती संभाजी पालवे, सरपंच रावसाहेब गुंजाळ, अमोल वाघ, विलास टेमकर, राजेंद्र पाठक,पिणू मुळे, युवानेते जालिंदर वामन,अशोक टेमकर, सागर कराळे, प्रतीक घोरपडे,रवी घोरपडे,श्याम लोहकरे, साईनाथ गुंजाळ, गीताराम झाडे, वाढेकर महाराज, ज्ञानेश्वर घोरपडे, सचिन गुंजाळ, बबनराव गुंजाळ, तहसीलदार श्याम वाडकर, तालुका कृषी अधिकारी प्रवीण भोर, आरोग्य अधिकारी हरिभाऊ गाडे,मंडळ कृषी अधिकारी सुलक्षणा पाटोळे, वीज कंपनीचे उपअभियंता मिसाळ, आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या