Thursday, April 25, 2024
HomeनगरVIDEO : केंद्रीय मंत्री पियुष गोयल शिर्डीत; साईबाबांचं घेतलं दर्शन

VIDEO : केंद्रीय मंत्री पियुष गोयल शिर्डीत; साईबाबांचं घेतलं दर्शन

शिर्डी । शहर प्रतिनिधी

ज्याप्रकारे एका भयंकर संकटाचा जगाला सामना करावा लागला. आता नव्या उम्मीदीने आणी नव्या विश्वासाने आपला देश उभा राहिला असल्याने वेगाने देशाची प्रगती तसेच विकास व्हावा अशी प्रार्थना श्री साईबाबांच्या चरणी केली असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी शिर्डीत प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले.

- Advertisement -

दरम्यान केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी रविवारी दुपारी मध्यान्ह आरतीला साईदरबारी हजेरी लावून साईसमाधीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी गोयल यांच्या हस्ते श्री साईबाबांची पाद्यपूजा करण्यात आली. यावेळी भाजपचे आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी साईसंस्थानच्या हेलीपँडवर मंत्री पियुष गोयल यांचे स्वागत करून शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने साईमंदीरात सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी साईसंस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, साईसंस्थानचे विश्वस्त अनुराधा आदीक, सचिन गुजर, अविनाश दंडवते, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, मा.नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, रवींद्र गोंदकर, अभिजित संकलेचा, नरेश सुराणा आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

दर्शनानंतर मंत्री गोयल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हणाले की,श्री साईबाबांचे दर्शन घेऊन आज मनस्वी आनंद झाला असून बाबांचा आशिर्वाद मिळाला आहे.या पवित्र श्री साईबाबांच्या पुण्यभुमी शिर्डी नगरीतून दृढ विश्वासाने मी जात असून बाबांचा आशिर्वाद सदैव जगातील तसेच देशातील सर्व श्रद्धाळूंवर राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनसेवा फाऊंडेशनच्या वतीने फुलांपासून तयार करण्यात येत असलेल्या अगरबत्तीच्या उत्पादनाची माहिती दिली.

गुरुस्थान परिसरात भाविकांनी आवाज दिल्यानंतर मंत्री पियुष गोयल यांनी सूरक्षा कर्मचाऱ्यांना बाजूला सारत भाविकांसोबत सेल्फी काढून दिल्याने केंद्रीय मंत्री गोयल यांच्या सरळ आणी साधेपणाचे दर्शन घडले.

- Advertisment -

ताज्या बातम्या