Thursday, April 25, 2024
Homeजळगावमंत्री पाटील यांनी केली ई-पी पाहणी अ‍ॅपद्वारे पेर्‍याची नोंद

मंत्री पाटील यांनी केली ई-पी पाहणी अ‍ॅपद्वारे पेर्‍याची नोंद

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील (Water Supply and Sanitation Minister Gulabrao Patil) यांनी आज आपल्या स्वत:च्या शेतावर (on his own farm) जाऊन ई-पीक पाहणी अ‍ॅपच्या (E-Peak Inspection App) माध्यमातून पेर्‍याची नोंद (Note the seeds through) केली. तसेच सर्व शेतकर्‍यांनी आपापल्या शेतातील पेरणीबाबतची माहिती यात अपडेट करण्याचे आवाहन ना.गुलाबराव पाटील यांनी केले.

- Advertisement -

राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील हे आज सकाळी पाळधी येथील निवासस्थानी आले. सकाळीच त्यांनी पाळधी शिवारात असलेल्या आपल्या शेतात जाऊन ई-पीक पाहणी ऍपच्या माध्यमातून शेतातील पेर्‍याची नोंद त्यांनी केली. राज्य शासनाच्या महसूल विभागा मार्फत राज्यात ई-पीक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकर्‍यांना आपला पीक पेरा स्वत: हून नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

या मोबाईल ऍप द्वारे शेतकरी आपल्या पिकांच्या नोंदी, बांधावरच्या झाडांच्या नोंदी, व चालू पड, कायम पड क्षेत्राच्या नोंदी अक्षांस व रेखांशासह नोंदविण्याची सोय देण्यात आलेली आहे. या स्मार्टफोन अ‍ॅप्लीकेशनची सुधारित 2.0 आवृत्ती ही 1 ऑगस्टपासून सादर करण्यात आली आहे. यात शेतकर्‍यांना एक मुख्य आणि तीन दुय्यम खरीप पिकाची नोंद करण्यची सुविधा प्रदान करण्यात आली आहे.

यावेळी माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, प्रगतशील शेतकरी नारायणआप्पा सोनवणे, सरपंच प्रकाश पाटील, माजी सरपंच अरुण पाटील, कोतवाल राहुल शिरोळे , किशोर शिरोळे , योगेश पाटील, विजय पाटील , अनिल माळी , आबा माळी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या