Saturday, April 27, 2024
Homeनगरपरिवहनमंत्री अनिल परब यांनी केली साईबाबांकडे ‘ही’ प्रार्थना

परिवहनमंत्री अनिल परब यांनी केली साईबाबांकडे ‘ही’ प्रार्थना

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

राज्यातील एसटी कर्मचारी संपाचा (ST Staff Strike) तिढा सुटावा यासाठी श्री साईबाबांकडे प्रार्थना (Prayer to Shri Sai Baba) केली असून सर्व कर्मचार्‍यांनी तातडीने कामावर रूजू व्हावे असे आवाहन राज्याचे परिवहनमंत्री ना. अनिल परब (Minister of Transport Anil Parab) यांनी शिर्डी (Shirdi) साईदरबारी हजेरी लावत केले आहे.

- Advertisement -

दरम्यान महाराष्ट्र राज्याचे परिवहन तथा संसदीय कार्यमंत्री ना.अनिल परब (Minister of Transport Anil Parab) यांनी शनिवारी माध्यान्ह आरतीला शिर्डीत (Shirdi) येऊन साईदरबारी (Sai baba) हजेरी लावली. श्री साईबाबांची आरतीला उपस्थित राहून साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत (Chief Executive Officer Bhagyashree Banayat) यांच्या हस्ते ना.अनिल परब (Minister of Transport Anil Parab) यांचा शाल, पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मंदीरप्रमुख रमेश चौधरी, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, संस्थानचे सुरक्षा प्रमुख अण्णासाहेब परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान राज्यातील एसटी कर्मचार्‍यांच्या संपाला (ST Staff Strike) एक महिना उलटून गेला तरीसुद्धा संपावर अद्याप तोडगा निघाला नाही आहे. राज्य सरकारने ऐतिहासिक पगारवाढ देऊन सुद्घा एसटी कर्मचार्‍यांचा संप (ST Staff Strike) सूरूच आहे.

संप मिटत नसल्याने या प्रश्नी परिवहनमंत्री ना. परब यांना साईदर्शनानंतर पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी सांगितले की एसटी कर्मचार्‍यांच्या संपाचा तिढा सुटावा यासाठी साईबाबांना साकडे घातले आहे. मी साईबाबांच्या दर्शनासाठी नेहमीच येत असतो. एसटी कामगारांनी तातडीने कामावर रुजू व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या