Friday, April 26, 2024
Homeनगरशेतकर्‍यांच्या विजेसंबंधी समस्या तातडीने सोडवा - ना. तनपुरे

शेतकर्‍यांच्या विजेसंबंधी समस्या तातडीने सोडवा – ना. तनपुरे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

महाविकास आघाडी शासनाने लागू केलेल्या उर्जा धोरणास शेतकऱी चांगला प्रतिसाद देत असून थकित वीज देयकांचा भरणा करीत आहेत. या पार्श्वभूमीवर विजेसंबधी समस्यांना (Electrical problems) शेतकर्‍यांना सामोरे जावे लागणार नाही याची महावितरणने दक्षता घेण्याचे निर्देश उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Minister of State for Energy Prajakta Tanpure) यांनी श्रीरामपूर (Shrirampur) येथे दिले.

- Advertisement -

श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील वीज विषयक समस्यांचा आढावा (Review of power issues) घेण्यासाठी विभागीय कार्यालयात आयोजित बैठकीत ना. तनपुरे बोलत होते. यावेळी आ. लहू कानडे (MLA Lahu Kanade), नगराध्यक्षा अनुराधा आदिक (Mayor Anuradha Adik), उपनगराध्यक्ष करण ससाणे (Deputy Mayor Karan Sasane) , श्रीरामपूरचे महावितरणचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात (Anil Thorat) उपस्थित होते.

ना. प्राजक्त तनपुरे यांनी या आढावा बैठकीत (review meeting) पदाधिकारी, नागरिक व शेतकर्‍यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नवीन वीज धोरणाद्वारे शेतकर्‍यांना थकित वीज देयकात भरीव सुट दिली असल्याचे त्यांनी सांगितले. अहमदनगर जिल्ह्यात दहा नवीन सब स्टेशन उभारण्यात येणार (new sub station will be set up) असून त्यापैकी दोन सब स्टेशनचा फायदा श्रीरामपूर तालुक्यातील नागरिकांना आणि शेतकर्‍यांना होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. श्रीरामपूर शहर पाणीपुरवठा योजनेला (Shrirampur City Water Supply Scheme)अखंडित वीजपुरवठा करण्याचे निर्देश यावेळी मंत्रीमहोदयांनी दिले. महावितरणने शेतकर्‍यांना चांगल्या सुविधा देतानाच ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी शेतकर्‍यांना खर्च करण्यास सांगू नये अशी सक्त ताकीद दिली. नागरिक व शेतकर्‍यांनी चालू वीज बिल भरण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. वीज विषयक समस्यांचा आढावा घेताना लोकप्रतिनिधींच्या सूचनांची दखल घेऊन महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी त्या त्वरित सोडविण्याचे निर्देशित केले.

आ. लहू कानडे यांनी ग्रामीण व शहरी भागातील वीज पुरवठा सुरळीत रहावा तसेच तालुक्यातील सबस्टेशनची संख्या वाढवावी, अशी सूचना केली. नगरपरिषदेतर्फे पाणी पुरवठा योजनेच्या देयकाचा भरणा करण्यात येत असून वीज पुरवठा खंडित न करण्याची मागणी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी यावेळी केली. श्रीरामपूर शहरालगत सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

महावितरणचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात यांनी तालुक्यातील चालू असलेल्या व नियोजित योजनांचा तपशिल सादर केला. आढावा बैठकीत महावितरण कंपनीचे अधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी, नागरिक आणि शेतकऱी सहभागी झाले होते.

टाकळीभानचे सहा. अभियंता सक्तीच्या रजेवर

काही दिवसांपूर्वी टाकळीभान परिसरात विजेचे आकडे टाकण्याचे काम सुरू आहे त्यावर लवकरात लवकर पायबंदी घालावी असे आदेश ना. तनपुरे यांनी दिले होते. मात्र याबाबत पुन्हा तक्रारी आल्यानंतर त्यांची चौकशी केली असता त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचे ना. तनपुरे यांच्या लक्षात येताच त्यांनी त्या परिसरात काम करणारे सहा. अभियंता प्रल्हाद टाक यांना सक्तीच्या रजेवर पाठविले असल्याची माहिती श्रीरामपूर उपविभागाचे मुख्य अभियंता अनिल थोरात यांनी दिली.

नगरपालिकेत विविध प्रश्नांवर चर्चा

ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पालिकेत येताच त्यांचे नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी स्वागत केले. नगरपालिका पाणीपुरवठा वीज प्रश्न तसेच शहराच्या विकास कामांबाबतही चर्चा झाली. लसीचा तुटवडा असल्याने अनेकांना लस मिळत नसल्याची तक्रारही करण्यात आली. तसेच आमदार एकतर्फी वागतात. राष्ट्रवादी अथवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम करत नसल्याच्या तक्रारीही यावेळी करण्यात आल्या. यावेळी विविध विषयांवर चर्चा करून प्रश्न सोडविण्याबाबत ना. तनपुरे यांनी आश्वासन दिले.

ना. प्राजक्त तनपुरे यांनी काल वीज वितरण कार्यालयातील बैठक आटोपल्यानंतर माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या निवासस्थानी चहापाणी घेेतले. यावेळच्या चर्चेत दादासाहेब तनपुरे, प्रसाद तनपुरे यांच्यापासूनच्या आठवणींना उजाळा दिला. ना. तनपुरे यांनी सिध्दार्थ मुरकुटे यांच्या तब्बेतीची विचारपुस केली. यावेळी माजी आ. भानुदास मुरकुटे, मंजुश्री मुरकुटे, ज्ञानेश्वर काळे, सिध्दार्थ मुरकुटे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या