Thursday, April 25, 2024
Homeजळगावजलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चु कडु जिल्हा दौऱ्यावर

जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चु कडु जिल्हा दौऱ्यावर

जळगाव – jalgaon

राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चु कडु (Minister of State Bachchu Kadu) हे शुक्रवारी दि.27 मे, 2022 व शनिवारी दि.28 मे, 2022 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

- Advertisement -

शुक्रवार दि.27 मे, 2022 रोजी सकाळी 8.00 वाजता अमरावती (Amravati) येथून (Bhusaval) भुसावळ, जि.जळगावकडे प्रयाण, निलेशे बोरा यांच्या घरी सदिच्छा भेट (स्थळ-चौघुले प्लॉट, मुमराबाद नाका, मारोती मंदिराजवळ शनीपेठ, जळगाव), सकाळी 10.00 वा.भुसावळ येथे आगमन व राखीव, सकाळी 11.00 वा. मुख्याधिकारी, प्रांत, तहसिलदार, पोलीस प्रशासन यांच्यासोबत बैठक व शासकीय कार्यक्रम (स्थळ- प्रांत कार्यालय, भुसावळ).

दुपारी 12.00 वा. अनिलभाऊ चौधरी यांच्या निवासस्थानी भेट व राखीव (स्थळ- न्यू एरिया वार्ड, तेली समाज मंगल कार्यालय, भुसावळ), दुपारी 1.00 वा. फिरोज शेख, प्रहार अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष, जळगाव यांच्या निवासस्थानी भेट (स्थळ- आशा हाईट, खडका रोड, भुसावळ).

दुपारी 1.30 वा. संजय आवटे, प्रहार जिल्हा उपाध्यक्ष, जळगाव यांच्या निवासस्थानी भेट (स्थळ- गडकरी नगर, शंभूराजे मंडळ जवळ, भुसावळ), दुपारी 1.50 वा. विनोद कदम, प्रहार मागासवर्ग जिल्हाध्यक्ष, जळगाव यांच्या निवासस्थानी भेट (स्थळ- प्रल्हादनगर, रिंग रोड, भुसावळ).

दुपारी 2.00 वा. दीपनगर वीजनिर्मिती केंद्र येथे कामगारांच्या समस्यांसदर्भात बैठक (स्थळ- दीपनगर, ता.भुसावळ), दुपारी 3.10 वा. साईबाबा मंदीर दर्शन व भुसावळ कडे प्रयाण (स्थळ-जामनेर रोड, श्रद्धा नगर, भुसावळ).

दुपारी 3.30 वा. साईबाबा मंदिर ते अलॉयसिस स्कूल पर्यत बाईक रॅली व रोड शो (स्थळ – नाहाटा कॉलेज-दीनदयाळ नगर-आनंदनगर-साई डेयरी-भवानी पेठ-बाजार पेठ पोलीस स्टेशन-गांधी पुतळा-सेंट अलॉयसिस स्कूल), सायं. 5.00 अकलुद येथे कार्यकर्ता मेळावा व अपंगांना साहित्य वाटप कार्यक्रम (स्थळ-अकलूद), सायं. 5.30 वा. यावल शहरात आगमन व स्वागत समारंभ (स्थळ-बोरवाल गेट, यावल).

सायं. 5.45 वा. बोरवाल गेट ते सिनेमा टॉकीज रोड शो. (स्थळ-बोरवाल गेट, धनगर वाडा, मेन रोड, बारी चौक, सिनेमा टॉकीज), सायं. 6.30 वा. प्रहार जनशक्ती पक्ष कार्यकर्ता मेळावा व जाहिर सभा (स्थळ-सुदर्शन सिनेमा टॉकीज, यावल), सायं. 7.30 वा. यावल येथून फैजपूरकडे प्रयाण. रात्री 8.00 वा. फैजपूर शहर येथे आगमन व स्वागत समारंभ, रात्री 8.10 वा. फैजपूर येथून रावेरकडे प्रयाण, रात्री 9.00 वा. रावेर येथे आगमन व योगेश पाटील यांच्या निवासस्थानी भेट (स्थळ- शिक्षक कॉलनी, स्टेशन रोड, रावेर).

रात्री 9.30 वा. राजेंद्र महाजन, जिल्हाध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या विवाह सोहळ्यास सदिच्छा भेट (स्थळ- छत्रपती शिवाजी महाराज चौक, व्यायाम शाळा, रावेर), रात्री 10.30 वा. बुद्ध विहारात मुर्ती स्थापना व योगेश निकम, प्रहार युवक तालुकाध्यक्ष यांच्या घरी भेट (स्थळ- पिंप्री, ता.रावेर).

शनिवार दि. 28 मे, 2022 रोजी सकाळी 7.00 वाजता मुक्ताईनगर येथून शासकीय वाहनाने खांडवी मार्गे जामोद, जि.जळगावकडे प्रयाण.

- Advertisment -

ताज्या बातम्या